संजय दत्त आणखी ३० दिवस तुरुंगाबाहेरच

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त याच्या संचित रजेमध्ये सोमवारी आणखी ३० दिवसांनी वाढ करण्यात आली.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी अभिनेता संजय दत्त याच्या संचित रजेमध्ये (पॅरोल) सोमवारी आणखी ३० दिवसांनी वाढ करण्यात आली. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी त्याच्या रजेमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली.
गेल्या महिन्यात म्हणजेच ६ डिसेंबर रोजी संजयची पॅरोलची रजा मंजूर झाली होती. पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण देत त्याने रजेसाठी अर्ज केला होता, मात्र, त्याचवेळी मान्यता एका पार्टीत दिसल्याने संजयच्या रजेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते व मोठा वादही झाला होता. अखेर पंधरा दिवसांनी म्हणजेच २१ डिसेंबर रोजी संजय पॅरोलवर बाहेर पडला. यानंतर संजय दत्तने पत्नीला टीबी असल्याचे सांगत सुट्टी वाढवून मिळावी, असा अर्ज केला. त्यावर सोमवारी निर्णय झाला.
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवण्यात आले असून त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र यापूर्वी त्याने काही काळ तुरूंगात घालवल्याने त्याला आता साडेतीन वर्षेच तुरूंगात रहावे लागणार आहे. मे महिन्यापासून संजय येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Actor sanjay dutts parol leave sanctioned