पिंपरी: पिंपरी महापालिकेतील वादग्रस्त ठरलेले अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचीही तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महापालिकेतील उप आयुक्त स्मिता झगडे यांची वर्णी लागली आहे.

हेही वाचा : अधिकार नसतानाही अन्य विभागांकडून अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
pune mahavikas aghadi, mahavikas aghadi show of strength pune
पुण्यात महाविकास आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन,तीन उमेदवार अर्ज भरणार; जाहीर सभा
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
nmmc chief dr kailas shinde visit municipal corporation hospitals in vashi
औषधचिठ्ठी न देण्याच्या धोरणाचे काटेकोर पालन करा; नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

हेही वाचा : विसर्जन मिरवणुकीच्या विलंबाची नैतिक जबाबदारी आमची; मानाच्या गणपती मंडळ पदाधिकाऱ्यांची भावना

पिंपरी पालिकेतील यापूर्वीचे आयुक्त राजेश पाटील यांचे सर्वात ‘खास’ अधिकारी म्हणून ढाकणे यांची ओळख होती. दीड वर्षापूर्वी राजेश पाटील व ढाकणे एकाच दिवशी महापालिकेत रूजू झाले होते. पाटील आयुक्त असले तरी महापालिकेचा जवळपास सर्वच कारभार ढाकणे हेच पाहत होते. ढाकणे ‘समांतर आयुक्तालय’ चालवत असल्याची कबुली प्रशासनातील अधिकारी देत होते. लोकप्रतिनिधीही त्यास दुजोरा देत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या इशाऱ्यावर काम करणारे आयुक्त असल्याचा ठपका ठेवून राजेश पाटील यांची नव्या सरकारने नुकतीच बदली केली. त्याचवेळी ढाकणे यांचीही बदली होणार, हेही स्पष्ट होते. त्यानुसार, मंगळवारी (१३ सप्टेंबर) ढाकणे यांची उचलबांगडी करण्यात आली. महापालिकेत उपायुक्तपदावर असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदावर बढती देण्यात आली आहे.