scorecardresearch

पुणे : अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे ‘बेंचमार्क’ सर्वेक्षण

राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे ‘बेंचमार्क’ सर्वेक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) करण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था( संग्रहित छायचित्र )

राज्यातील अनुसूचित जातीच्या सर्व शासकीय योजनांचे ‘बेंचमार्क’ सर्वेक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून राज्याच्या अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व ५९ जातींची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सद्यस्थिती, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण, लाभ न घेण्याची कारणे अशा अंगाने अभ्यास करण्यात येणार असून, संशोधनाअंती धोरणात्मक शिफारशींसह संशोधन अहवाल शासनाला सादर केला जाईल.

२०११ च्या जनगणनेनुसार राज्यामध्ये अनुसूचित जातीमधील अनेक जातींची लोकसंख्या अत्यल्प आहे. त्यामुळे सर्वेक्षणात सर्व ५९ जातींचा समावेश असणे आवश्यक आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत असलेल्या विविध समाजाच्या संस्था, संघटना, अशासकीय संस्थांतील शिष्टमंडळांनी त्यांच्याकडे उपलब्ध असणारे क्षेत्र, कुटुंब यादी, अनुषंगिक माहिती बार्टी कार्यालयाला research@barti.in या ईमेलवर पाठवावी. मिळणारी माहिती अनुसूचित जातीतील सर्व ५९ जातींचे सर्वेक्षण करण्यास उपयुक्त ठरणार असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्रकाशन व प्रसिद्धी विभागाचे प्रमुख उमेश सोनवणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे नमूद केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Benchmark survey of all government schemes for scheduled castes pune print news amy