पिंपरी : महापारेषण कंपनीच्या भोसरीतील अति उच्चदाब उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी (२३ मार्च) सकाळी सहा वाजता बिघाड झाला. त्यामुळे भोसरी, आकुर्डीसह शहरातील सुमारे ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. उन्हाच्या कडाक्यात दिवसभर वीजपुरवठा नसल्याने नागरिकांचे हाल झाले. तर, काम ठप्प झाल्याने उद्योगांना कोटय़वधींचे नुकसान सोसावे लागले. आर्थिक नुकसानीचा आकडा १०० कोटींहून जास्त असल्याचा दावा लघुउद्योजक संघटनेने केला आहे.

भोसरीतील गवळी माथा येथे महापारेषण कंपनीच्या अति उच्चदाब २२० केव्ही उपकेंद्रामध्ये १०० एमव्हीए क्षमतेचे दोन व ७५ एमव्हीए क्षमतेचा एक असे एकूण तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातील १०० एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरद्वारे महावितरणच्या एकूण २६ वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येतो. यातील १०० एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बुधवारी सकाळी बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या एकूण १० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, भोसरी एमआयडीसी परिसरासह नेहरूनगर, यशवंतनगर, शांतिनगर, भोसरी गावठाण, इंद्रायणीनगर, चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक तसेच आकुर्डी परिसरातील साडेचार हजार औद्योगिक ग्राहकांसह एकूण ६० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला.

The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

ऐन कडाक्याच्या उन्हाळय़ात ही परिस्थिती ओढावल्याने उकाडय़ाने नागरिकांचे हाल झाले. उद्योगांचे काम बंद पडले. त्यानंतर, बिघाड झालेल्या १०० एमव्हीएच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची महापारेषणकडून कसून तपासणी केली. तोपर्यंत चक्राकार पद्धतीने विजेचे भारनियमन करून सर्व ग्राहकांना वीजपुरवठा करण्याचा पर्याय निवडण्यात आला. ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे नादुरुस्त झाल्याचे आढळून आल्यानंतर महापारेषणकडून तो बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यायी व्यवस्थेतून भोसरी व आकुर्डीतील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला.

पिंपरी-चिंचवडमधील सात हजार उद्योगांना बुधवारी सकाळपासून वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे उद्योगांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. महापारेषणच्या नियोजनशून्य कारभारामुळे उद्योगविश्वाला जवळपास १०० कोटींचा फटका बसला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यास तीन दिवस लागतील, असे महापारेषणकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी बराच वाढणार आहे. 

– संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना

एक मांजर पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये शिरल्याने शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तोपर्यंत चक्राकार पद्धतीने भारनियमन करण्यात येत आहे. ग्राहकांनी काटेकोरपणे विजेचा वापर करून सहकार्य करावे.

– ज्योती चिमटे, अधिकारी, महापारेषण