पुणे : देशातील बाजारपेठेत गव्हाची मुबलक उपलब्धता राहावी. दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसू नये, म्हणून केंद्र सरकारने गहू निर्यातीवर बंदी आणली होती. पण, आता गव्हाच्या पिठाची निर्यात वाढली. ही निर्यात गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत उच्चांकी होती. त्यामुळे सरकार पुन्हा हस्तक्षेप करून गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवरही बंदी घालण्याचा विचार करीत आहे. 

गहू निर्यात बंदी करताच व्यापाऱ्यांनी गव्हाच्या पिठाची निर्यात करण्याचा मार्ग अवलंबला होता. जागतिक बाजारपेठेतून मोठी मागणी असल्यामुळे पिठाची निर्यात प्रचंड वाढली. देशातून दर वर्षांला सरासरी सहा हजार ते आठ हजार टन पिठाची निर्यात होते. पण, १३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीला बंदी घातल्यापासून अचानक पिठाची निर्यात सात-आठ पटीने अधिक झाली आहे. निर्यात थांबवली नाही तर गहू निर्यात बंदीचा निर्णय फोल ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे केंद्र सरकार गव्हाच्या पिठाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. 

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Smuggling of liquor from Goa by vehicle stuff of worth 61 lakh seized
वाहनातून गोव्यातील मद्यसाठ्याची तस्करी, ६१ लाखाचा मुद्देमाल जप्त
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

गहू निर्यातीला पर्याय..

गहू मिल उद्योगातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातबंदीचा निर्णय न घेतल्यास पिठाची निर्यात लवकरच एक लाख टनांवर जाणार आहे. त्यामुळे जूनच्या सुरुवातीपासून पिठाच्या निर्यातीवर बंदी घालण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत २४७० लाख डॉलर इतक्या किमतीचे गव्हाचे पीठ निर्यात झाले होते. यंदा जून महिन्यापर्यंतच २७४ टक्क्यांची वाढ होऊन २१ हजार २०० लाख (२१२ कोटी) डॉलर किमतीचे पीठ निर्यात झाले आहे. ही निर्यात व्यापाऱ्यांनी गहू निर्यातीला पर्याय म्हणूनच केल्याचे समोर आल्यामुळे सरकार तातडीने हस्तक्षेप करण्याच्या तयारीत आहे. 

बांगलादेश सर्वात मोठा आयातदार

आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये भारतातून बांगलादेशाला सर्वाधिक दहा हजार लाख डॉलर किमतीच्या गव्हाची निर्यात झाली आहे. तरीही गहू निर्यात बंदीनंतर बांगलादेश, इंडोनेशिया, ओमान, येमेन आणि संयुक्त अरब अमिरातीने राजनैतिक मार्गाने भारताकडे गहू निर्यात करण्याची मागणी केली होती. १ एप्रिल ते १४ जून या काळात भारताने २९.७० लाख टन गहू आणि २.५९ लाख टन गव्हाचे पीठ निर्यात केले आहे.

गव्हाची निर्यात चांगली होऊ लागताच बाजारातील गव्हाचे दर सरासरी २२ ते २३ रुपये प्रति किलोंवर गेले होते. गहू निर्यात बंदीचा निर्णय झाल्यानंतर दर दोन-तीन रुपयाने उतरले होते. आता गव्हाच्या पिठाची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतल्यास बाजारातील गव्हाचे दर एक-दोन रुपयांनी उतरू शकतात. मात्र, या निर्णयाचा व्यापारी आणि मिल उद्योगावर विपरीत परिणाम होईल, 

अनुप शहा, गहू पीठ निर्यातदार, पुणे