पुणे : महाविद्यालयीन शिक्षणासाठी ऑनलाइन कर्ज घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थिनीची सायबर चोरट्यांनी बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका विद्यार्थिनीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  विद्यार्थिनीने महाविद्यालयीन शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. सायबर चोरट्यांनी  तिची माहिती व छायाचित्रे मागवून  घेतली.

या  छायाचित्रांचा गैरवापर करुन अश्लील छायाचित्रे तयार करण्यात आली.  त्यानंतर छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर  विद्यार्थिनीला झारखंडमधून दूरध्वनी येण्यास सुरुवात झाली. घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली आाणि तक्रार दिली.  सायबर चोरट्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तपास करत आहेत.