यशस्विनी गोडसे यांच्याकडून लघुपटाची निर्मिती

चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र.. ‘प्रतीक्षा’, ‘आणि चिनार लाल झाला’, ‘रारंगढांग’ या कादंबऱ्यांसह ‘एका स्टुडिओचे आत्मवृत्त’ या पुरस्कारविजेत्या पुस्तकाचे लेखक.. ‘फिल्म्स डिव्हिजन’मध्ये घडविलेली कारकीर्द.. असा प्रभाकर पेंढारकर यांचा जीवनप्रवास ‘एक परीसस्पर्श’ या  लघुपटाद्वारे उलगडणार आहे.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…

पेंढारकर यांच्याकडे लेखन सहायक म्हणून काम करण्याच्या माध्यमातून त्यांचा सहवास लाभलेल्या यशस्विनी गोडसे यांनी ‘प्रभाकर पेंढारकर-एक परीसस्पर्श’ या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांचे पती डॉ. मोहन गोडसे हे या लघुपटाचे निर्माते असून पेंढारकर यांच्यासमवेत फिल्म डिव्हिजनमध्ये काम केलेले अरुण गोंगाडे लघुपटाचे सहदिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे रविवारी (५ मार्च) दुपारी साडेचार वाजता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत या लघुपटाचे प्रदर्शन होणार आहे.

या लघुपट निर्मितीचा प्रवास यशस्विनी गोडसे यांनी एखाद्या चित्रपटाप्रमाणे उलगडला. प्रभाकर पेंढारकर यांचे कादंबरीलेखन सुरू असताना मी सहायक म्हणून त्यांना मदत करीत होते. या निमित्ताने त्यांचे व्यक्तिमत्त्व मला जवळून अनुभवता आले. लेखक आणि दिग्दर्शक म्हणून एवढी मोठी कारकीर्द असूनही ते कधी प्रसिद्धीच्या झोतात राहिले नाहीत. अडीच वर्षे सहवास लाभल्याने जणू मी त्यांची मुलगीच झाली होते. मला जे पेंढारकरकाका कळले, समजले आणि उमगले ते सर्वाना सांगावे यासाठीचा हा खटाटोप. त्यांनी लघुपट निर्मितीमध्ये आपले आयुष्य वेचले. मग एखादा लघुपट निर्माण करूनच काकांना आदरांजली का अर्पण करू नये या भूमिकेतून हा लघुपट साकारला गेला, असे यशस्विनी गोडसे यांनी सांगितले.

पेंढारकर यांच्या पत्नी लक्ष्मी पेंढारकर यांच्यापाशी मी हा विचार बोलून दाखविला तेव्हा त्यांनी मोठय़ा आनंदाने या प्रस्तावाला संमती दिली. एवढेच नाही तर, फिल्म्स डिव्हिजनमधील अ‍ॅनिमेशन आणि कार्टून विभागाचे प्रमुख असलेल्या अरुण गोंगाडे यांचे नाव सुचविले. पेंढारकर यांच्यासमवेत अनेक वर्षे काम केलेल्या गोंगाडे यांनी तत्काळ होकार दिला.

कोल्हापूर येथील चंद्रकांत जोशी यांनी पूर्वी चित्रीत करून ठेवलेल्या लघुपटातील काही भाग यामध्ये आम्ही वापरला आहे. त्यामुळे पेंढारकर बोलत असल्याची तीन दृश्ये या लघुपटामध्ये समाविष्ट आहेत, असेही गोडसे यांनी सांगितले.

लघुपटात काय..

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, विजया राजाध्यक्ष आणि डॉ. वीणा देव यांच्यासह लष्करी जीवनावरील कादंबऱ्यांबाबत कर्नल (निवृत्त) जयसिंह पेंडसे यांचे पेंढारकर यांच्या साहित्यिक कर्तृत्वाबद्दल, प्रेम वैद्य आणि डॉ. विकास आमटे यांचे फिल्म्स डिव्हिजनमधील कामाबद्दलचे मनोगत लघुपटात समाविष्ट करण्यात आले आहे. ‘मीठभाकर’ चित्रपटातील बालकलाकार ते उमेदवारीच्या काळाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी, राजकमल स्टुडिओमध्ये व्ही. शांताराम यांच्यासमवेत केलेल्या कामाबद्दल व्ही. रवींद्र यांनी, तर व्यक्ती म्हणून पेंढारकर यांची बहीण आणि मुलींचे मनोगत लघुपटामध्ये आहे.