पुणे : दिवसा निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानामुळे राज्यात सध्या दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी रात्री अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्रीचा गारवा कमी झाला आहे.

राज्यात गेल्या आठवडय़ापासून रात्रीच्या किमान तापमानात वाढ सुरू झाली होती. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार किमान तापमानात गेल्या तीन ते चार दिवसांत २ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ४ अंशांनी वाढले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही बहुतांश भागात किमान तापमान २ ते ४ अंशांनी वाढले आहे. अनेक भागांत गेल्या आठवडय़ात ११ ते १४ अंशांवर असलेला किमान तापमानाचा पारा आता १८ ते २० अंशांवर गेला आहे. त्यामुळे रात्रीचा गारवा कमी झाला आहे. मुंबईसह कोकण विभागात मात्र किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. दिवसा आकाश निरभ्र रहात असल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील काही भाग वगळता इतरत्र ते सरासरीजवळ आले आहे. मध्य महाराष्ट्रात ३१ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमान आहे. याच विभागात सोलापूर येथे रविवारी राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भातही कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३४ अंशांवर आहे. कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पुढील चार दिवस कोरडे हवामान राहणार आहे. विदर्भात मात्र २४ फेब्रुवारीला पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Rising Temperatures in Maharashtra, Rising Temperatures in Maharashtra Lead to Increase in Heatstroke Patients, Heatstroke Patients in Maharashtra, Heatstroke Patients in Dhule, Heatstroke Patients in thane, Heatstroke Patients in wardha, thane, Dhule, wardha, Mumbai, Mumbai news,
धुळे, ठाणे, वर्ध्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ, राज्यात उष्माघाताचे १८४ रुग्ण
pune vegetable prices marathi news, pune vegetable prices today marathi news
पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ
Nashik heats up temperature at 40.4 degree Celsius but sprinkles of rain in some areas
नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव