तरुणाईमध्ये सध्या सर्वात लोकप्रिय असणारे अ‍ॅप्लिकेशन म्हणजे टिकटॉक. वेगवेगळी गाणी तसेच संवादांवर लिप्सिंग करुन या अ‍ॅपच्या मदतीने मजेदार व्हिडिओ तयार करतात येतात. टिकटॉक वापरणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे यावरुनच हे अ‍ॅप्लिकेशन किती लोकप्रिय आहे याचा अंदाज बांधता येतो. तरुणाईला तर या अ‍ॅप्लिकेशनने वेड लावलं आहे. मात्र याच टिकटॉक व्हिडिओच्या वेडापायी आळंदीमधील काही तरुणांना तरुंगाची हवा खावी लागली आहे. हातामध्ये शस्र घेऊन या तरुणांनी टिकटॉक व्हिडिओ शूट केला. याच प्रकरण व्हिडिओद्वारे शहरामध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आळंदीमधील काही स्थानिक तरुणांनी टिकटॉकवर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या ट्रेलरची नक्कल करणारा व्हिडिओ शूट केला. यामध्ये त्याच चित्रपटातील संवाद या तरुणांनी वापरले होते. ‘आळंदी पॅटर्न डीव्हाय बॉईज’ नावाने आठ तरुणांने टिकटॉकवर हा व्हिडिओ अपलोड केला. पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पोलिसांची नजर या व्हिडिओवर पडली. त्यानंतर पोलिसांनी स्वत: या प्रकरणीची दखल घेतली. या तरुणांवर पोलिसांनी स्वत: कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी सखोल तपास करुन या तरुणांना शोधून काढलं आणि त्यांना अट केली. टिकटॉकवरील व्हिडिओ शूट करण्याच्या नादात तरुणांनी सार्वजनिक ठिकाणी तलवार आणि सुऱ्यासारखी शस्रे वापरली होती. त्यांनी वापरलेली सर्व शस्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत. हा प्रकार म्हणजे शहरामध्ये दहशत परसवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप पोलिसांनी या तरुणांवर ठेवला आहे. अटक करण्यात आलेलेल सर्व तरुण १८ वर्ष वयाचे आहेत. अटक करण्यात आलेल्या आठ पैकी सहा जणांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी यांनी दिली आहे.