पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देत गुंड गजा मारणेने थेट वडगाव मावळच्या न्यायालयात पोहचून जामीन मिळवला आहे. एकीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस त्याचा शोध घेत होते. पथकं देखील रवाना करण्यात आली होती. मात्र, आज दुपारी साडेचारच्या सुमारास वडगावच्या न्यायालयात हजर राहात अटक पूर्व जामीन मिळवला आहे.

तळोजा कारागृह ते पुणे शहरा पर्यंत जंगी मिरवणूक काढल्यासारख्या एकाच रांगेत शेकडो आलिशान मोटरी आणि टोल नाका येथून विना टोल केलेला प्रवास त्याच बरोबर फूड मॉल येथे करण्यात आलेली दहशत याप्रकरणी गुंड मारणे आणि त्याच्या शेकडो साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी, 36 जणांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 14 आलिशान मोटरी जप्त केल्या आहेत.

ISIS, five ISIS terrorists, Special court Delhi,
पुण्यातील तरुणीसह आयसिसच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी, दिल्लीतील विशेष न्यायालयाकडून शिक्षा
mumbai crime news, mumbai online fraud marathi news
मुंबई: गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्यांनी केले बँक खाते रिकामे
house buyer interest marathi news
घराचा ताबा विलंबाने मिळाल्यास खरेदीदार व्याजासाठी पात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खरेदीदारांना दिलासा
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता

पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्य आरोपी गुंड गजा मारणे याचा शोध घेत असताना हातावर तुरी देत वडगाव न्यायलायत हजर होऊन जामीन मिळवला असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस देखील चक्रावले असून या प्रकरणाचा पोलिसांना थांग पत्ता नाही अस पोलिसांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे पुढील भूमिका पोलीस काय घेणार हे पाहावे लागेल.