अर्थसंकल्पीय अधिवेशानात संसदेवरही मोर्चा नेण्याचा निर्णय

पुणे : प्रजासत्ताकदिनी देशातील सर्व जिल्ह्यांत ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात संसदेवरही मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाची शनिवारी कर्नाल (हरियाणा) येथील गुरुद्वारा डेरा कार सेवा येथे ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक हन्नान मौला यांनी ही माहिती दिली.

joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..
dubai flood effect
पुरामुळे अस्ताव्यस्त झालेल्या युएईला पूर्वपदावर आणायला किती खर्च येणार?
Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?

हन्नान मौला म्हणाले, या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, प्रजासत्ताक दिनी जिल्हास्तरावरील सरकारी कार्यक्रम पार पडल्यानंतर देशभरात जिल्हास्तरावर ट्रॅक्टर रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल. याच दिवशी हरियाणातील जिंद येथे किसान महापंचायतीचे आयोजन करण्यात येईल. या महापंचायतीमध्ये केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिल्लीत करावयाच्या आंदोलनाची तारीख आणि रुपरेषा निश्चित करण्यात येईल.

मागण्या काय?

  • शेतमाल हमीभाव कायदा करा
  • शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा
  • शेतकऱ्यांना पाच हजार रुपये पेन्शन द्या 
  • शेतीयोग्य जमिनीचे भूसंपादन करू नका 
  • लखीमपूर खेरी हत्याकांडप्रकरणी राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या 
  • नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या