पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यातील मावळ तालुक्‍यातील मळवली विकसन केंद्रातील १९ गावे तसेच ग्रामीण विकसन केंद्रातील आठ गावातील हरकतींवर सुनावणीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या गावांमधील हरकतींवर १९ ते २६ जुलै या कालावधीत सुनावणी घेतली जाणार आहे. आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही सुनावणी होणार आहे.

पीएमआरडीएने गेल्या वर्षी प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला. या आराखड्यावर ६० हजार हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत १६४ गावांमधील २८ हजार हरकतींवर सुनावणी घेण्यात आली आहे. आता उर्वरित गावांमधील हरकतींवर सुनावणी घेण्याचे काम सुरू आहे.

Dombivli, MMRDA to Close mothagaon Mankoli Flyover , mothagaon Mankoli Flyover, mothagaon Mankoli Flyover Bridge Close for four days, dombivali news, Mankoli Flyover Bridge news, Weight load Checking, marathi news, dombivali flyover close
डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पूल चार दिवस वाहतुकीसाठी बंद
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प

गावाचे नाव आणि सुनावणीची तारीख पुढीलप्रमाणे

कुसगाव बु. – १९ जुलै, मळवली, कार्ला, डोंगरगाव, देवघर आणि वर्सोली – २० जुलै, औंढे खु, देवळे, भाजे, बोरज, पाटण, ओंढोली, मुंढावरे आणि पाथरगाव – २१ जुलै, पिंपळोली, कुणेनामा, ताजे, सदापूर आणि वाकसाई – २५ जुलै, कडूस (ता.,खेड), पौड, (ता.मुळशी), किकवी (ता.भोर), सांगरूण (ता.हवेली), राहु (ता.दौंड), पाबळ, न्हावरा (ता.शिरुर) – २६ जुलै