पिंपरी : मोरवाडी न्यायालयाच्या मागील बाजूला मोकळ्या जागेतील औद्योगिक कचऱ्याला बुधवारी दुपारी आग लागली. रबर, प्लास्टिक कचऱ्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोरवाडी न्यायालयाच्या इमारतीच्या मागील बाजूला रिकामे मैदान आहे. त्या मैदानात औद्योगिक कचरा टाकला आहे. त्यामध्ये रबर, प्लास्टिक साहित्य होते. दुपारी या कचऱ्याला आग लागली. आग मोठ्या प्रमाणात धुमसत होती. धुराचे लोट सर्वत्र पसरले. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. जवळच असलेल्या एम्पायर इस्टेट इमारतीमध्ये हा धूर पसरला. तसेच ऑटो क्लस्टर आणि मोरवाडीमध्ये धुराचे लोट पसरले.

हेही वाचा…पुणे मेट्रो पुढे सरकेना! मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची काही अटींसह परवानगी; सरकारही निर्णय घेईना

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शहरातील सर्व अग्निशमन पथके घटनास्थळी दाखल झाली. पीएमआरडीए, एमआयडीसी, टाटा मोटर्सचे बंबही बोलविले होते. आग आटोक्यात आल्याचे अग्निशम विभागाने सांगितले. दरम्यान, पिंपळे सौदागर संरक्षण हद्दीतील मोकळ्या मैदानावरील गवताला आग लागली होती. ती आग ही आटोक्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri industrial waste fire near morwadi court smoke engulfing in the area pune print news ggy 03 psg
Show comments