पुणे : बुधवार पेठेतील पटवर्धन वाड्याचा काही भाग कोसळल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले. बुधवार पेठेत पटवर्धन वाडा आहे. मंगळवारी दुपारी वाड्यातील आतील बाजूची भिंत कोसळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने मदतकार्य सुरु केले.वाड्यात अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना किरकोळ स्वरुपाची दुखापत झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी पंकज जगताप यांनी दिली.

हेही वाचा…पुणे : कात्रजमधून खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका

दरम्यान, गंज पेठेतील महात्मा फुले स्मारक परिसरात मंगळवारी दुपारी एका घरात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune a wall of old wada collapsed near budhwar peth firefighters save 2 persons pune print news rbk 25 psg
First published on: 20-02-2024 at 18:18 IST