पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमधील संभाव्य उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली असतानाच पुण्याचा उमेदवार कोण असेल, या संदर्भात शहर भाजपच्या नेत्यांकडून सावध भूमिका घेण्यात आली आहे. उमेदवार पुण्याचा असेल, की पुण्याबाहेरचा याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. त्या संदर्भात तूर्त काही बोलता येणार नाही. पुण्याच्या उमेदवाराचे नाव केंद्रीय संसदीय समिती निश्चित करेल, अशी भूमिका भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सोमवारी मांडली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे. देवधर यांनी त्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केल्याने आणि पुणेकर असल्याचा प्रचार त्यांनी सुरू केल्याने या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात शहराध्यक्ष घाटे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सावध भूमिका मांडली.

sanjay raut spoke offensive and derogatory manner about female candidate navneet rana says girish mahajan
संजय राऊतांबाबत बोलून आम्हाला…”, गिरीश महाजनांची टीका
Pune, Pune election, Campaigning in Pune
पुण्यात आज प्रचाराची रणधुमाळी; प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या जाहीर सभा
BJP youth leader in contact with Sharad Pawar group for candidacy from Raver
रावेरमधून उमेदवारीसाठी भाजपचा युवानेता शरद पवार गटाच्या गळाला?
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हेही वाचा : पुणे जिल्ह्यातील तिसऱ्या महापालिकेसाठी प्रशासकीय हालचाली सुरू

लोकसभेसाठी कोण इच्छुक आहे, याची माहिती माध्यमांतूनच मिळत आहे. उमेदवार कोण असेल हे केंद्रीय स्तरावरच निश्चित होईल. निवडणुकीची तयारी करणे अयोग्य नाही. उमेदवार कोण असेल हे लवकरच स्पष्ट होईल. प्रदेश पातळीवरून आदेश आल्यास निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येईल, असे घाटे यांनी सांगितले. पक्षाच्या पदाधिकाऱ्याला तिकीट मिळेल, असेही उत्तर त्यांनी दिले.