पुणे : आयात उमेदवाराला शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणारा असाल तर काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया भोसरी विधानसभेचे माजी आमदार, शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असणारे विलास लांडे यांनी दिली आहे. “२०१९ मध्ये झालेल्या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सांगण्यावरून अमोल कोल्हे यांचे मी प्रामाणिकपणे काम केलं. आतादेखील आयात उमेदवाराला उमेदवारी मिळणार असेल, तर काही गोष्टींचा विचार करावा लागेल, असा थेट इशारा विलास लांडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : पिंपरी : रक्षक सोसायटी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

विलास लांडे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांपासून मी इच्छुक आहे. २००९ पासून ते आजतागायत शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहे. काही गोष्टी नेत्यांच्या निर्णयानंतर बदलाव्या लागतात. तस वागावं लागतं. आगामी २०२४ शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. यात राजकीय परिस्थिती उलटसुलट झाली आहे. २०१९ ला सुद्धा या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी केली. चार महिने मतदारसंघात फिरलो. वातावरण निर्मिती केली. ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षात अमोल कोल्हे यांची एन्ट्री झाली. त्यांना उमेदवारी देण्यात आली. तरी अजित पवारांच्या शब्दामुळे त्यांचे प्रामाणिकपणे मी काम केले. एवढं सगळं केल्यानंतर आयात उमेदवाराला उमेदवारी देणार असतील तर काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवारांना दिला आहे. त्यामुळे नेमकं राष्ट्रवादीकडून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील की माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी मिळणार हे बघणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा : पिंपरीतील औद्योगिक कचरा आग प्रकरण : वायूप्रदूषण झाल्याने जागामालकास नोटीस, ‘इतका’ दंड भरण्याचे आदेश

विलास लांडे यांनी ताठरती भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटापुढे पेच निर्माण होऊ शकतो. माजी आमदार विलास लांडे हे शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांचा ३५ वर्षांपासूनचा राजकीय अनुभव आहे. असे असताना देखील आजतागायत त्यांचं खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. २०१९ ला मिळालेल्या संधीने त्यांना ऐनवेळी हुलकावणी दिली. नुकतंच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पक्षाने आदेश दिल्यास राष्ट्रवादी पक्षाकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. यामुळेच आता विलास लांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune former ncp leader vilas lande warns ajit pawar over shirur lok sabha constituency issue kjp 91 css