कोथरूडमध्ये सुरू झालेल्या जोशी उपाहारगृहाची भेट खवय्यांना नक्कीच काही तरी खास वेगळं मिळणारी भेट ठरेल.

जोशी स्वीट्स या मिठाई उद्योगाची ही नवी शाखा.

autism spectrum disorder
Health Special: स्वमग्नता (autism spectrum disorder) म्हणजे काय? उपचारांवर लक्ष केंद्रित करा…
Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
transgender police recruitment marathi news
एमपीएससी: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवारांसाठीचे नियम निश्चित

खाण्याची काही ठिकाणं अशी असतात, की ती बघितल्यावरच छान वाटतं. मन प्रसन्न होतं. आपण योग्य ठिकाणी आलो याची खूणगाठ पटते. अशीच खूणगाठ गेल्या आठवडय़ात पटली. कर्वे रस्त्यावर अगदी नुकतंच सुरू झालेलं जोशी उपाहारगृह हे ते ठिकाण. एसएनडीटी समोर असलेली पाळंदे कुरिअरची इमारत ही जोशी उपाहारगृहात जाण्यासाठीची ठळक खूण. याच इमारतीत तेजस परचुरे याने हे नवं हॉटेल सुरू केलं आहे. मिठाईच्या उद्योगात प्रसिद्ध असलेल्या जोशी स्वीट्स यांची ही नवी शाखा आहे. तेजसनी नुकताच हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि लगेच या नव्या उपाहारगृहाचा प्रारंभ केला.

इथली उत्तम, देखणी सजावट, स्वच्छता, तत्परता हे सारं प्रथम दर्शनीच लक्षात येतं. त्याबरोबरच आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ‘लाइव्ह किचन.’ आपण जे पदार्थ इथे घेतो ते तयार होताना आपल्याला इथे आपल्यासमोरच बघायला मिळतात. त्यामुळे पदार्थाइतकंच हे देखील इथलं एक वेगळेपण. आधी काय घ्यायचं हे ठरवावं लागतं. त्यासाठी भिंतीवर असलेल्या जोशी उपाहारगृह मेनू याचा आधार घ्यावा लागतो. ती यादी वाचायची आणि नंतर काय काय घ्यायचं ते ठरवून तेवढे पैसे देऊन कूपन घ्यायची, कूपन देऊन पदार्थ घ्यायचे, अशी स्वयंसेवा पद्धत इथे आहे. नेहमीचे म्हणजे मराठी, दाक्षिणात्य असे सगळे पदार्थ इथे आहेतच. मात्र प्रत्येक पदार्थाची उत्तम आणि वेगळी चव ही इथली खासियत. मग ती मिसळ असो किंवा पिठलं भाकरी असो किंवा व्हेज थाळी असो. तुम्हाला काही ना काही छान खाल्ल्याचं समाधान इथले सगळे पदार्थ देतात. दोन भाज्या, डाळफ्राय, पुऱ्या किंवा पोळ्या, जिरा राइस, एक गोड पदार्थ, कोशिंबीर, पापड आदी विविध पदार्थाची थाळी घेतली की चवींचा आणि पोटभर जेवणाचा आनंद मिळतो. ज्यांना पूर्ण थाळी नको असेल त्यांच्यासाठी पिठलं भाकरी, खर्डा किंवा पोळी भाजी किंवा छोले भटुरे, आलू पराठा हे पर्यायही इथे आहेत.

परचुरे कुटुंबीय मंडळी शिरसी, हुबळी, उडपीकडची असल्यामुळे या उपाहारगृहातील काही पदार्थामध्ये दाक्षिणात्य चव जपण्यात आली आहे. ते तुम्हाला इथे काही पदार्थ खाताना नक्कीच जाणवेल. इथल्या मिसळीत फरसाणबरोबर मटकी व बटाटा यांची एकत्रित भाजी वापरली जाते. शिवाय खास मसाले वापरून केलेला रस्साही चवीष्ट असतो. साजूक तुपातील शिरा हा इथे मिळणारा एक मस्त गोड पदार्थ. त्या बरोबरच साजूक तुपातील खिचडी देखील इथे मिळते. पुरी कुर्मा हा पदार्थ तसा फार ठिकाणी मिळत नाही. ती डिश इथे दिली जाते. पुरी भाजी वेगळी आणि पुरी कुर्मा हा पदार्थ वेगळा. चवीष्ट ग्रेव्हीमध्ये भाज्या घालून तयार केलेला कुर्मा आणि बरोबर पुऱ्या अशा पुरी कुम्र्याची चव इथे नक्कीच घ्यायला हवी. त्या बरोबरच नेहमी मिळणारी पुरी भाजीही इथे दिली जाते.

सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे, उपीट, शिरा, इडली सांबार, वडा सांबार असेही अनेक पदार्थ इथे उपलब्ध असतात. स्पेशल पाव भाजी, मटार करंजी, ढोकळा, वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच, भजी हेही पदार्थ आहेतच. पुलाव किंवा लाल मिरची, जिरे, मोहरी यांची तडका फोडणी दिलेला दहीभात हे इथले आणखी दोन टेस्टी प्रकार. तेजस बरोबरच त्याची आई माधवी आणि भाऊ श्रेयस हेही जोशी उपाहारगृहाची जबाबदारी सांभाळतात. इथल्या सगळ्या पदार्थावर येणारे ग्राहक खूश असल्याचा परचुरे कुटुंबीयांचा अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्हालाही घेता येईल.