पुणे : महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत. आकुर्डी खंडोबा माळ चौक ते पीएमआरडी कार्यालय इथंपर्यंत भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीत ८० वर्षाच्या आजीदेखील सहभागी झाल्याने सर्वांचं लक्ष आपसूकच त्यांच्याकडे जात आहे. अनुसया कदम असं ८० वर्षीय आजीचे नाव असून त्या कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांच्या उत्साह पाहून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा येत आहे.

आणखी वाचा-पुणे : बोहरी आळीत आग; रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले

मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे अशी लढत बघायला मिळत आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना आणि महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून मोठं शक्तिप्रदर्शन करत रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीत ८० वर्षाच्या आजीला पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो आहे. अनुसया कदम यांचा कार्यकर्त्यांच्यासोबत अगदी तरुणांना लाजवेल असा उत्साह बघायला मिळतो आहे. अनुसाय कदम या कट्टर शिवसैनिक आहेत. ढोल ताशांच्या गजरात ही रॅली पीएमआरडी कार्यालयाच्या दिशेने पुढे जात आहे.