पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरात वाढ करूनही ओला आणि उबर या कंपन्यांनी त्याची अंमलबजावणी केलेली नाही. याबाबत कॅबचालक आणि कंपन्या यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २७) होणाऱ्या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीलाही या कंपन्यांनी उत्तर दिले नसल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा >>> सुप्रिया सुळेंसाठी शरद पवार मैदानात; बारामती लोकसभेची पुण्यात आढावा बैठक

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

वातानुकूलित (एसी) टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते. यानंतर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दराचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केला होता. या प्रस्तावाला तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे हे नवीन दर जानेवारी महिन्यात लागू झाले असूनही ओला, उबरने याची अंमलबजावणी केलेली नाही, अशी कॅबचालकांची तक्रार आहे.

या प्रकरणी आरटीओमध्ये ओला, उबर कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कॅबचालकांच्या संघटनांच्या दोन बैठकी झाल्या. या दोन्ही बैठकीत दोन्ही बाजू आपापल्या म्हणण्यावर ठाम राहिल्या. याचबरोबर कॅबचालकांच्या संघटनांमध्येही वाद होऊन त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले होते. आता जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी या प्रकरणी बैठक होत आहे. या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा >>> फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला अजितदादांचा बूस्ट

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आयोजित बैठकीला ओला आणि उबर कंपनीने कनिष्ठ पातळीवरील प्रतिनिधींनी पाठवले. त्यामुळे या कंपन्या आमच्या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत भाडेवाढीच्या मागणीवर तोडगा न निघाल्यास ५ मार्चपासून कॅबचालक आंदोलन करतील.

– डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गिग कामगार मंच

प्रादेशिक परिवहन कार्यालयात ओला, उबर कंपन्या आणि कॅबचालक संघटना यांच्यात दोन बैठक झाल्या. या बैठकांमध्ये दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तोडगा निघू शकला नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी