धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला कोथरुड पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रेम चंदू पवार (वय २९, रा. घोटावडे फाटा, पिरगुंट ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. तक्रारदार मुलगी पीएमपी बसने प्रवास करत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी पवारने मुलीशी लगट केली. माझ्याशी मैत्री करशील का. आपण काॅफी प्यायला जाऊ, असे सांगून त्याने मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवारने पुन्हा मुलीचा पाठलाग केला. पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या मुलीशी लगट करुन तिचा विनयभंग केला. मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पवारला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minor girl molested running pmp bus one arrested by kothrud police pune print news rbk 25 ysh
First published on: 17-01-2023 at 10:19 IST