मागील काही महिन्यापासून कुस्ती संघटनेमध्ये दोन गट पडले आहे. त्याच दरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहे. पण एक गट नगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेणार आहे. त्यामुळे नेमका कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचं असा प्रश्न कुस्तीगीरासमोर आहे. या प्रकारावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- आंतरराष्ट्रीय प्रवाशांची पुणे विमानतळावर तपासणी सुरूया

MIM, Kolhapur, Hindu organizations,
कोल्हापुरात ‘एमआयएम’चा पाठिंबा घेण्यामागे कोणते षडयंत्र दडले आहे; हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सवाल
Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?

शरद पवार म्हणाले की, दुर्देवाने कुस्ती परिषदेत दोन गट पडले आहेत. हे खरं आहे. पण मी भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षांना घरी बोलवून हा वाद मिटवला आहे. पण दुसऱ्या गटाचीही नगरला स्पर्धा घेण्याची इच्छा आहे. पण मी म्हटलं की, पहिले पुण्याची महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्यवस्थित पार पाडू आणि मग नगरच्या स्पर्धेचं बघुया, तसेच पुण्याच्या कुस्ती स्पर्धेला हजर राहण्याबाबत तारखा बघून ठरवणार असल्याच त्यांनी यावेळी सांगितले.