मिळकत कर थकवलेल्या शहरातील बडय़ा थकबाकीदारांवर महापालिकेने धडक कारवाई सुरू केली असून या कारवाईत शनिवारी बालेवाडी येथील ऑर्चिड या पंचतारांकित हॉटेलवर कारवाई करण्यात आली. या हॉटेलकडे १६ कोटी २८ लाखांची थकबाकी असल्यामुळे हॉटेल ‘सील’ करण्यात आले. प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत हे या हॉटेलचे संचालक आहेत.

कर आकारणी व कर संकलन कार्यालयामार्फत शनिवारी सहायक कर आकारणी व कर संकलन प्रमुख वैभव कडलख यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हॉटेल ऑर्चिडकडे मिळकत कराची १६ कोटी ६७ लाख ५६ हजार ४२२ रुपये इतकी थकबाकी आहे. अभय योजनेअंतर्गत हॉटेलला चार कोटी ६० लाख ७६ हजार ६८४ रुपये सवलत देण्यात आली होती. उर्वरित रक्कम संबंधितांनी भरणे बाकी होते. ही थकबाकी २००८ सालापासूनची आहे. दरवर्षी मिळकत कर विभागातर्फे थकित रक्कम वसुलीसाठी प्रयत्न केले जात होते. त्यानुसार हॉटेल व्यवस्थापनाकडून साडेतीन कोटी रुपये जमा करण्यात आले होते. मात्र उर्वरित थकबाकी देण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात होती. यंदाही वसुलीसाठी हॉटेलला नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र थकबाकी भरण्यास असमर्थता दाखवण्यात आल्यामुळे शनिवारी विशेष पथकाने थकबाकी वसुलीसाठी हे हॉटेल ‘सील’ केले. महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

homes, mill workers, mmrda
संथ कारभाराचा गिरणी कामगारांना फटका, रांजनोळीतील १२४४ घरांची दुरुस्ती रखडलेली; २५२१ घरांची सोडतही लांबणीवर
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

प्रशासन अधिकारी गिरीष पत्की, विभागीय निरीक्षक दीपक राऊत, श्रीकांत देशपांडे, पेठ निरीक्षक राजेश उपरपेल्ली, राजकुमार टण्णू, गणेश मांजरे, राजू ढाकणे, सचिन शिंदे, मिलिंद चव्हाण, महेश बेंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

थकबाकी वसुलीसाठी दोन सहायक कर आकारणी प्रमुख तसेच पाच बँड पथके, २२ विभागीय निरीक्षक, १२५ पेठ निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची दहा वसुली पथके तयार करण्यात आली असून त्यांच्यामार्फत वसुलीची कार्यवाही केली जात आहे. ज्या मिळकत करधारकांचा कर थकलेला आहे त्यांनी लवकरात लवकर कर भरून कारवाई टाळावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त सुहास मापारी यांनी केले आहे.