भाजप-राष्ट्रवादीच्या राजकारणात महापौरांची फरपट

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील राजकारणात ‘सँडविच’ झालेल्या महापौर शकुंतला धराडे यांची गुरुवारी पुन्हा फरपट झाली. सभा तहकूब करण्याच्या मुद्दय़ावरून ‘महापौर विरूद्ध राष्ट्रवादी’ असेच चित्र सभागृहात होते. सभेनंतर महापौर कक्षातही वादाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या नगरसेविका महापौरांना फैलावर घेत असताना जगताप समर्थक नगरसेविका त्यांच्या मदतीला आल्या. या वेळी दोन्ही गटात पत्रकारांसमोरच जोरदार वादावादी झाली.

Sharad pawar ajit pawar
शरद पवारांची भाजपाबरोबरची युती का रखडली? अजित पवारांनी सांगितली अंदर की बात; म्हणाले, “चर्चेकरता निघालो, पण…”
NCP Sharad Pawar group has filed its candidacy of Dhairyashil Mohite-Patil in Madha
माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी दाखल
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Supriya Sule Vs Sunetra Pawar
ठरलं! बारामतीत नणंद-भावजयीचा सामना, सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर होताच सुनेत्रा पवारांच्या नावाचीही घोषणा

महापौर शकुंतला धराडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दोन सभांचे कामकाज होणार होते. दुपारी एकची सभा तहकूब झाली. त्यानंतर, चार वाजता होणारी सभाही तहकूब करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता. तथापि, महापौरांनी भाजपशी सलग्न नगरसेविका सीमा सावळे यांना बोलण्याची संधी दिली, त्यावरून वादाला सुरूवात झाली. त्यानंतरच्या चर्चेत सभागृहात बराच गोंधळ झाला. महापौरांवर सभा तहकुबीसाठी दबाव होता. या मुद्दय़ावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महापौरांना चांगलेच फैलावर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौरांनी त्यांना जुमानले नाही. राष्ट्रवादीतील नगरसेवक सभागृहातून बाहेर निघून गेले. त्यानंतर, महापौरांना सभा तहकूब करावी लागली. या वादाचे लोण नंतर महापौर कक्षात पसरले. महापौरांपाठोपाठ राष्ट्रवादीच्या नगरसेविका महापौर कक्षात गेल्या आणि वाद घालू लागल्या. महापौरांनी जशास तसे उत्तर देण्यास सुरूवात केली.  राष्ट्रवादीच्या महापौर आणि राष्ट्रवादीच्याच नगरसेविका यांच्यातील वाद वाढत गेला. जगताप समर्थक नगरसेविकांनी महापौरांची बाजू घेत वादात उडी घेतली. हा सगळा गोंधळ पत्रकारांसमोरच सुरू होता. या वादामुळे आगामी काळातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

आचारसंहितेविषयी संभ्रम

आचारसंहितेविषयी असलेली संभ्रमावस्था सभेत मांडण्याचा प्रयत्न काही सदस्यांनी केला. प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांची माहिती सभागृहात दिली. नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच २३ नोव्हेंबरला पुढील सभा घेण्याचे महापौरांनी जाहीर केले.