पिंपरी- चिंचवड : महानगर पालिकेच्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर आणि आय नेत्र हॉस्पिटलमध्ये अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्यासह परराज्यांतून या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण येत आहेत. अवघ्या कमी कालावधीत हे नेत्र रुग्णालय अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावत आहे. असं असलं तरी अद्यापही अद्यावत सुविधा उपलब्ध नसल्याचं समोर आल आहे. सर्जन डॉक्टरांची आणखी एक टीम त्या ठिकाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. यासंबंधी लवकरच आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी लोकसत्ता ऑनलाईन शी बोलताना दिली आहे.

हेही वाचा : पिंपरी : फ्लिपकार्टच्या हबमधून मोबाईल लंपास करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला अटक, अशी करायचा चोरी…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मासुळकर कॉलनी या ठिकाणी नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. या रुग्णालयात काच बिंदू, तिरळेपण, पापण्यांचे आजार, डोळ्यावरील पडदा यावरील उपचार केले जात आहेत. दररोज १५ रुग्णांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केली जात आहे. दरम्यान, या रुग्णालयात तीन सर्जन डॉक्टर आहेत. डॉ. रूपाली महेशगौरी, डॉ. महेश टिकेकर आणि डॉ. प्राची बाकरे हे तिघेही मास्टर ऑफ सर्जन आणि उच्चशिक्षित असलेले डॉक्टर्स आहेत असं असलं तरी आणखी तीन जणांची टीम या रुग्णालयात असणं गरजेचं आहे. जेणेकरून दररोज १५ पेक्षा अधिक रुग्णांच्या डोळ्यांची सर्जरी केली जाऊ शकते. डोळ्यांच्या मागच्या पडद्याच्या म्हणजेच रेटीनाचे आजाराचे निदान या रुग्णालयात होते, परंतु उपचार घेण्यासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

हेही वाचा : अबब! तब्बल सात कोटींचा अश्व; पशू प्रेमींची पाहण्यासाठी झुंबड

नेत्र रुग्णालयात दररोज २०० ते २५० रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यामुळे रुग्णांची गर्दी होत आहे. टोकणचे दोन काउंटर असणे गरजेचे आहे. सध्या तिथे एकच काउंटर सुरू आहे. रुग्णालयात दिशा फलक आणि सूचना फलक नाहीत. रुग्ण अत्यावस्थेत असल्यास त्याला ऑक्सिजन सिलेंडरचा सेटअप नाही. त्यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी स्थिती या रुग्णालयाची आहे. रुग्णालयात अद्यावत अशा मशिनरी येणे अपेक्षित आहे. ग्रीन लेझर, विट्रोटॉमी, बायोमायक्रोस्कोप, क्रायोयुनिट, बी – स्कॅन मशीन (डोळ्याचे सोनिग्राफी मशीन) या अद्यावत मशीन आणि अद्यावत डॉक्टरांची गरज या नेत्र रुग्णालयाला आहे. कमी कालावधीत हे रुग्णालय नेत्र रुग्णांसाठी आशादायी ठरत आहे. परंतु, यात आणखी लक्ष देऊन नेत्र रुग्णालयाला काय नको? काय हवं! हे पाहणं महानगर पालिकेचे कर्तव्य आहे.

Story img Loader