पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सव आणि मोहरम या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी बुधवारी पथसंचलन केले आहे. यावेळी पूर्व-तयारी करत शहरात जातीय दंग्यासारखे प्रसंग घडू नयेत यासाठी पोलिसांच्या विशेष पथकाने रंगीत तालीम देखील केली. यावर्षीचा गणेशोत्सव हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने आणि शासनाने घालून दिलेल्या अटीनुसार पार पडणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांनी पथसंचलन करत कायदा-सुव्यवस्थेकडे आपलं विशेष लक्ष असणार आहे असं सांगितलं.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीलक्स चौक, मिलिंद नगर, रिव्हर रोड, आंबेडकर नगर, बौद्ध नगर, पिंपरी मुख्य बाजार पेठ, शगुन चौक असा रूटमार्च काढण्यात आला. दरम्यान, डीलक्स चौक याठिकाणी जातीय दंगलीसारखे प्रकार घडल्यास त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याबाबत सर्व अधिकारी व कर्मचाऱी यांनी रंगीत तालीम झाली. यावेळी ५० पोलीस कर्मचाऱ्यासह ९ पोलीस उपनिरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे हे उपस्थित होते.

garbage dump, Solapur, fire,
सोलापुरात कचरा आगारापाठोपाठ स्मार्ट सिटीच्या पाईप साठ्यालाही मोठी आग
akiyo morita
चिप-चरित्र: जपानी वर्चस्वाचा प्रारंभ
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
पिंपरी शहरात सराव करताना पोलिस कर्मचारी

 

पिंपरी हा मुख्य केंद्रबिंदू असल्याने परिसरात नेहमीच पोलिसांना सक्रीय राहावं लागतं. सध्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून त्या पार्श्वभूमीवर पिंपरीमधील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे.