दोन हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका

पुणे : करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील ३८०० सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दुसऱ्या टप्प्यातील दोन हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली  आहे.

   प्राधिकरणाने निवडणुकांचे सहा टप्पे के ले आहेत. २० सप्टेंबरपासून पहिल्या टप्प्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित के ल्या होत्या. स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली नसल्याने प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील ३८०० सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर के ले. आता दुसऱ्या टप्प्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी याबाबतचे आदेश दिलेआहेत.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका वगळता अन्य टप्प्यांतील निवडणुका परस्पर घेऊ नयेत. न्यायप्रविष्ट असलेल्या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात येऊ नये, असे आदेशात म्हटले आहे.

   दरम्यान, राज्यात डिसेंबर २०२० पर्यंत ४५ हजार ४०१ सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामध्ये या वर्षीच्या संस्थांच्या निवडणुकांची भर पडली असल्याने निवडणुका प्रलंबित असलेल्या संस्थांची संख्या ६५ हजारांवर पोहोचली आहे. प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी जिल्हा निवडणूक आराखडा तयार केला आहे.