बोचऱ्या टीका, आक्षेपार्ह मजकुरावर कारवाई

narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
Victory over division of voting caused by independents propaganda war on social media in last phase
अपक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनावर विजयाचा कौल? अंतिम टप्प्यात समाज माध्यमांवर प्रचारयुद्ध
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला असून प्रचारामुळे वातावरण तापले आहे. समाजमाध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्षांचे उमेदवार प्रयत्न करत आहेत. बोचऱ्या टीकेबरोबरच प्रतिस्पर्धी उमेदवारा विरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकाराचे दररोज ३० ते ४० संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात असल्याचे निरीक्षण पुणे पोलिसांच्या सोशल मीडिआ सेलमधील अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांना कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याबरोबरच समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकुरांवर बारकाईने नजर ठेवावी लागत आहे. समाजमाध्यमातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार रोखण्याचे आणि मजकूर प्रसारित करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आधिकार सोशल मीडिया सेलमधील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक मजकुरावर आणि संदेशावर  पोलिसांनी बारकाईने नजर ठेवली आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर बोचऱ्या टीकेबरोबरच प्रतिस्पर्धी उमेदवारांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती सोशल मीडिआ सेलमधील अधिकाऱ्यांनी दिली.

समाजमाध्यमांवर टाकण्यात येणारा टीकात्मक मजूकर आणि संदेश तत्काळ काढून टाकण्यात येतो, तसेच एखाद्या प्रकरणात मजकूर प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचा माग काढून त्याला पोलीस आयुक्तालयात बोलावले जाते. अशा प्रकारचा मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून समज दिली जाते. समज देऊन सुधारणा होत नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने दररोज ३० ते ४० आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात आहेत, असे निरीक्षण सोशल मीडिया सेलमधील अधिकाऱ्यांनी नोंदवले.

आक्षेपार्ह मजकूर नेमका काय?

प्रचाराची पातळी सोडून आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमावर प्रसारित करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्याची बदनामी करणारा मजकूर प्रसारित केला जातो. तसेच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांच्या छायाचित्रांचा दुरूपयोग करून मजकूर प्रसारित केला जातो. काही जण खोडसाळपणे खोटे वृत्त प्रसारित करून संभ्रम निर्माण करतात. संभ्रम निर्माण करणारे संदेश पाठविले जातात. अशा प्रकारचा मजकूर, छायाचित्रे तत्काळ काढून टाकण्याचे काम सोशल मीडिया सेलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केले जाते.

सोशल मीडिया सेलचे काम

समाजमाध्यमातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी २०१३ मध्ये राज्यात पहिल्यांदाच सोशल मीडिया सेलची स्थापना केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी २०१६ मध्ये सोशल मीडिआ सेलची स्थापना केली. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली या सेलमध्ये तीन पोलीस अधिकारी आणि दहा कर्मचारी काम करतात. समाजमाध्यमाची व्याप्ती मोठी असून सोशल मीडिया सेलचे काम अहोरात्र सुरू असते.