बहिणीची छेड काढल्याचा राग मनात धरून १६ वर्षीय मुलाचा सात जणांनी मिळून खून केल्याची घटना चाकणमध्ये घडली आहे. या प्रकरणी अद्याप केवळ एकाच आरोपीला बेड्या ठोकण्यात चाकण पोलिसांना यश आले आहे. तर, इतर सहा आरोपी फरार आहेत. मुलाचे अपहरण करून चाकण मार्केट यार्ड येथील मोकळ्या जागेत आणले, तिथे त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करत मुलीच्या भावाने लोखंडी रॉडने मारले. शिवाय, एकाने मुलाच्या डोक्यात दगड घातला. यात १६ वर्षीय रोहितचा मृत्यू झाला आहे.

रोहित प्रभू साहनी वय- १६ वर्षे अस खून झालेल्या मुलाचे नाव असून अराफत वाजीब शिकीलकर, युसूफ अर्षद काकर, करण पाबळे, हुजेब असिफ काकर, निहाल इनामदार, मन्सूर इनामदार, सोहेल इनामदार अशी आरोपींची नावे आहेत.

ताज्या अपडेट्ससाठी येथे क्लिक करा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहित प्रभू साहनी याने आरोपी अराफत वाजीब शिकीलकर याच्या बहिणीची छेड काढली होती. याचा राग मनात धरून त्याला जीवे मारण्याचा उद्देशाने हॉटेल स्नॅकर कट्टा येथून मन्सूर इनामदार याने त्याच्या दुचाकीवरून रोहितचे अपहरण केले आणि त्याला मार्केट यार्ड चाकण येथील मोकळ्या जागेत आणले. तिथे रोहित आणि इतर जमवलेल्या तरुणांसोबत वाद झाले. एकमेकांमध्ये झटापट झाली.

परंतु, रोहितला सात जणांनी मिळवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मुलीचा भाऊ अराफत याने रोहितच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. तर, युसूफने डोक्यात दगड घालून रोहितला ठार मारले. ही घटना चाकणच्या मार्केट यार्ड च्या मैदानात घडली असून अद्याप केवळ युसूफला अटक करण्यात आली आहे. तर, इतर सहा आरोपी फरार आहेत त्यांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत.