पुण्यात एका २५ वर्षीय महिलेवर एका घरात चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दत्तवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास एका महिलेने फोन केला की, एका महिलेचा घरातून रडण्याचा आवाज येत आहे. तिला मदतीचा गरज असल्याचा फोन आला. तेव्हा आम्ही तात्काळ घटनास्थळी धाव घेतला असता. तिथे सात-आठ महिला घराजवळ थांबलेल्या होत्या. त्या घराजवळ गेल्यावर आम्ही आतमधील महिलेला आवाज दिला. तेव्हा देखील रडण्याचा आवाज येत होता .पण काही केल्या दरवाजा उघडला गेला नाही. त्यावर अखेर आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा पीडित महिलेसह चार आरोपी आढळून आले. त्यानंतर तात्काळ पीडित महिलेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
13 year old school boy dies after drowning in private swimming pool
पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

पीडित महिलेकडे अधिक चौकशी केल्यावर अशी माहिती मिळाली की, चार आरोपीपैकी एक जण तिला भेटला. तेथून तिला एका घरात घेऊन आला. तिथे अगोदरच एक आरोपी होता. ती महिला घरात बसल्यावर काही वेळाने आणखी दोन आरोपी घरात शिरले. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडल्याचे तिने सांगितले.