पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाला उल्लेखनीय संघटनात्मक कार्य पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सर्वागीण विकासासाठी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने राबवलेल्या विविध उपक्रमांसाठी हा पुरस्कार पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाला देण्यात आला. या संघाची स्थापना १९८५ मध्ये झाली असून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विकासाचे विविध उपक्रम संघटनेतर्फे सातत्याने राबवले जातात. इतर शहरांमधील संघटनांनीही अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच संघटनात्मक कार्यक्रमांचे आयोजन पुणे वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे वेळोवेळी केले जाते.

 

Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान