scorecardresearch

नदीपात्रातील उघड्या गटारात अडकलेल्या गाईला जीवदान; अग्निशमन दलाकडून सुटका

भिडे पूल परिसरात नदीपात्रातील उघड्या गटारात अडकलेल्या गाईला अग्निशमन दलातील जवानांच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले.

नदीपात्रातील उघड्या गटारात अडकलेल्या गाईला जीवदान; अग्निशमन दलाकडून सुटका

पुणे : भिडे पूल परिसरात नदीपात्रातील उघड्या गटारात अडकलेल्या गाईला अग्निशमन दलातील जवानांच्या प्रयत्नांमुळे जीवदान मिळाले. झाकण नसलेल्या गटारात गाय पडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने तिला बाहेर काढले.

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने नदीपात्रातील भिडे पूल परिसरातील गटाराचे झाकण वाहून गेले होते. दुपारनंतर नदीपात्रातील पाणी ओसरण्यास सुरूवात झाली. त्या वेळी झाकण नसलेल्या गटारीत गाय पडल्याची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन दलाच्या कसबा केंद्राचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी, थोरात, सुरेश पवार, पी. के. ढमाले, संतोष अरगडे, शुक्रे, पेडणेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. गटारात पडलेल्या गाईला बाहेर काढण्यासाठी दोर सोडण्यात आला. मात्र, गटाराचा भाग अरुंद असल्याने गाईला बाहेर पडता येत नाही तसेच गटारात उतरणे अशक्य होते. जवानांनी टिकावाने गटाराचा भाग फोडला. गटारात दोर सोडून जवानांनी गाईला बांधले. अर्धा ते पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर गाईला बाहेर काढण्यात यश आले.

गाय गटारात पडल्याची माहिती मिळाल्यानंतर गाईचा मालक तेथे आला. मालकाच्या ताब्यात गाय देण्यात आली असल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी कमलेश चौधरी यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rescue cow stuck drain riverbed escape brigade pune print news ysh

ताज्या बातम्या