पुण्यातील सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. ही साडी शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे १६ किलो वजनाची आहे. त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली. दरम्यान वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते.