राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना माहिती होती, असा मोठा गौप्यस्फोट केला. तसेच मी अर्धीच गोष्ट सांगितल्याचं सूचक वक्तव्य केलं. याबाबत शरद पवारांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “मला देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर भाष्य करून त्यांचं आणखी महत्त्व वाढवावं असं मला वाटत नाही. त्यांनी इतक्या दिवसांनी यावर वक्तव्य का केलं हे त्यांनाच विचारण्याची गरज आहे.”

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Amol Kolhe, mic, Bhosari Constituency,
Video : …अन अमोल कोल्हे यांनी ‘त्या’ व्यक्तीच्या हातातून माईक का खेचला? राजकीय सभ्यतेचे दिले उदाहरण
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Sharad Pawar Wardha tour
वर्धा : शरद पवार यांच्याकडे काँग्रेस नेत्यांच्या तक्रारी, पवार म्हणाले…

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणार आहात का?

कसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेणार आहात का? असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “उमेदवार मला भेटले होते. त्यांनी एखादी चक्कर टाका असं सांगितलं. त्यामुळे विचार करू. पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी गेलो, कसब्यातही जावं लागेल. एका ठिकाणी गेलं तर दोन्ही ठिकाणी जावं लागतं.”

जोतिर्लिंगांवरून आसाम सरकारला पवारांनी फटकारलं

आसामने ज्योतिर्लिंग भीमाशंकरला नाही, तर आमच्याकडे असल्याचा दावा केला. यावर शरद पवार म्हणाले, “अवघ्या देशाला माहीत आहे की १२ ज्योतिर्लिंग कुठे आहेत. असं असताना ज्योतिर्लिंगाची जागा बदलण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यापेक्षा वेगळं काय सांगणार आहे.”

“त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा “

“गिरीश बापट यांना खरंच प्रचारात आणण्याची गरज होती का हे मला माहिती नाही. काही दिवसांपूर्वीच गिरीश बापट यांना मी भेटून आलो. त्यांची प्रकृती चांगली नाही. त्यांच्या यातना वाढू नये एवढीच अपेक्षा आहे,” असं मत व्यक्त करत शरद पवारांनी गिरीश बापट यांना व्हिलचेअरवर आणून प्रचार केल्याबद्दल व्यक्त केलं.

हेही वाचा : पिक्चर अभी बाकी है? शरद पवारांवरील गौप्यस्फोटानंतर फडणवीसांचं आणखी एक मोठं विधान, म्हणाले…

शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी मंगळवारी (२१ फेब्रुवारी) घेऊ, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याचं मी ऐकलं. मंगळवारी काय होतं ते बघुयात. सध्या ‘इंटरेस्टिंग’ घडतं आहे. आत्ता काय होईल हे सांगणं अवघड आहे.”