जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “उष्माघातामुळे बळी जाणं..” अप्पासाहेब धर्माधिकारी पुरस्कार सोहळ्यावरून राज ठाकरेंनी शिंदे सरकारला सुनावलं

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

काय म्हणाले शरद पवार?

काश्मीरमधील पुलवामा येथे आपल्या ४० जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपाच्या विचाराचे होते. भाजपानेच त्यांनी नियुक्त केली होती. आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितील. आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधांनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितल्यांचही, ते म्हणाले. ही सत्य परिस्थिती होती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा – समलैंगिक विवाह कायद्याला केंद्राकडून पुन्हा विरोध; कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकार म्हणाले, “शहरी विचारधारा…”

“…मग या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही”

आपल्या सैनिकांचं रक्षण करण्याची जबाबदारी केंद्रातील भाजपा सरकारवर आहे. मात्र, सरकार ही जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका ही त्यांनी केली.

हेही वाचा – “हे कुणीतरी जाणूनबुजून…”, राज ठाकरेंनी ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यासंदर्भात मांडली भूमिका; म्हणाले, “राजकीय स्वार्थाशिवाय…!”

सत्यपाल मलिकांनी नेमकं काय आरोप केले?

पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. “पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफनं एअरक्राफ्टची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडलाय असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं” , असं ते म्हणाले होते.