सहायक फौजदाराचा पाय मोडला

पोलिसांवर हल्ले होण्याचे लोण सुरूच असून, ते आता पिंपरी-चिंचवडमध्येही पोहोचले आहे. मोशी टोल नाका परिसरात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या युवकांना बंदोबस्तावरील पोलिसांनी हटकले म्हणून त्यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार घडला. या घटनेत सहायक फौजदाराचा पाय मोडला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Nagpur, Kunal, murde, alcohol,
नागपूर : मित्रांनी दारूच्या वादातून केली कुणालची हत्या.. वानाडोंगरीतील घटनेचा अखेर उलगडा
Washim, Vehicle accident,
वाशिम : लग्नसमारंभासाठी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात दोन ठार
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील

सुरेश चपटे असे या सहायक फौजदाराचे नाव आहे. रविवारी रात्री चपटे व अन्य दोन पोलीस मोशी टोल नाक्यावर बंदोबस्तावर होते. ‘पल्सर’ या दुचाकीवरून तीन युवक तेथून जात होते. संशय आल्याने पोलिसांनी त्यांना हटकले. पोलीस आपल्याला पकडणार हे लक्षात आल्याने त्या तरुणांनी दुचाकी थेट पोलिसांच्या अंगावर घातली. पुढे असलेल्या दोघा पोलिसांना त्यांनी हुलकावणी दिली. त्यानंतर चपटे गाडीपुढे आडवे आले असता, त्यांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे चपटे यांच्या पायाला गंभीर इजा झाली. त्यांचा पाय मोडल्याचे सांगण्यात येते. या घटनेनंतर ते तिघे आरोपी पळून गेले. तर जखमी चपटे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत. जकात नाक्यावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू आहे.

‘पल्सर’वर ते तिघे चालले होते. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी अंगावर गाडी घातली.

सुरेश चपटे, सहायक फौजदार