कर्नाटकमध्ये उघडकीस आलेल्या सेक्स स्कँडल प्रकरणामुळे जनता दल (सेक्युलर) पक्ष अडचणीत आला आहे. या कथित लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा हे भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. ते कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून, याच मतदारसंघातून ते भाजपा-जेडीएस युतीचे उमेदवारही आहेत. त्यांच्याविरोधात आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडून ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ जारी केली आहे. गेल्या २८ एप्रिल रोजी त्यांचा कथित लैंगिक शोषणात सहभाग दर्शविणारे काही व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले आहे. अशा प्रकारचे साधारण तीन हजार व्हिडीओ उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. प्रज्वल रेवण्णा डिप्लोमॅटिक पासपोर्टवर जर्मनीला पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, ब्ल्यू कॉर्नर नोटिशीच्या मदतीने त्यांना परत आणता येईल का?

इंटरपोलच्या रंगांवर आधारित नोटिसा

‘आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलिस संघटना’ म्हणजे इंटरपोल ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी काम करीत असते. ही संस्था गुन्हेगारांच्या शोधासाठी जगभरातील सुरक्षा यंत्रणांना विविध प्रकारच्या नोटिसा पाठवून सतर्क करण्याचे काम करते. ही नोटीस जारी केल्यानंतर संबंधित देशाच्या पोलिसांना या संदर्भातील माहिती इंटरपोलला देता येते. जगातील एकूण १९५ देश इंटरपोल संस्थेचे सदस्य आहेत. हे सदस्य देश एकमेकांच्या देशात पळून गेलेल्या गुन्हेगारांविरोधात नोटीस जारी करू शकतात. या विविध प्रकारच्या नोटिसा प्रथमदर्शनी लक्षात येण्याच्या दृष्टीने इंटरलपोलने त्यांना विविध रंग बहाल केले आहेत; जेणेकरून त्याद्वारे इंटरपोलच्या सदस्य देशांना संबंधित गुन्हेगार अथवा व्यक्तीची आवश्यक ती माहिती पुरवता येईल. या माहितीमध्ये संबंधित व्यक्तीची ओळख, तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी, ठावठिकाणा इत्यादींचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी कारवायांचा सामना करण्यासाठी, तसेच गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याशी संबंधित माहिती एकमेकांना देण्यासाठी या नोटिसा उपयोगी पडतात. प्रज्वल रेवण्णा यांच्याबद्दल ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. रेड, यलो, ब्ल्यू, ब्लॅक, ग्रीन, ऑरेंज व पर्पल अशा रंगांनुसार एकूण सात प्रकारच्या नोटिशी पाहायला मिळतात. रंगनिहाय प्रत्येक प्रकारच्या नोटिशीचा अर्थ वेगवेगळा आहे. आपण आता यातील प्रत्येक नोटिशीचा अर्थ समजून घेणार आहोत.

mcdonald's, Trademark,
ट्रेडमार्कचा वाद : मॅकडोनाल्ड्स पुन्हा बाद
Reliance Jio provides offers a range of prepaid data booster plans to keep users connected without interruptions checkout list
Reliance Jio Down : इंटरनेट सेवा खंडीत झाल्याने ग्राहकांच्या तक्रारींचा पूर, जिओ फायबरही काम करेना!
Red Cheery tiny powerhouse of nutritional benefits best consumed Ten To Fifteen in a bunch help combat numerous diseases
लाल चेरी मधुमेहासह ‘या’ तीन समस्यांवर ठरेल रामबाण उपाय; किती व कधी खाल्ली पाहिजेत? पोषणतज्ज्ञांकडून जाणून घ्या
Loksabha election 2024 BJP loss map analysis of BJP performance
भाजपाने कुठे गमावलं, कुठे कमावलं? जाणून घ्या निकालाचा गोषवारा
Hyderabad man faints from laughing too hard How is it possible
खूप हसल्यामुळे हैदराबादमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध; पण हे कसे शक्य? तज्ज्ञांनी केला खुलासा
dhca issues show cause notice to air india over passenger discomfort caused by long flight delays
 ‘एअर इंडिया’च्या विमानाला ३० तास उशीर; प्रवाशांचे प्रचंड हाल, ‘डीजीसीए’ची कारणे दाखवा नोटीस
pune Porsche care accident minor accused
“मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन”, पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्या डॉक्टरची धमकी!
series of misadventures in Sassoon hospital Department of Medical Education not taking any action
गैरकारभारांमुळे ‘सर्वोपचार’ रुग्णालयच ‘गंभीर आजारी’! ससूनमध्ये गैरप्रकारांची मालिका; वैद्यकीय शिक्षण विभाग बघ्याच्या भूमिकेत

हेही वाचा : AI आणि AGI मध्ये काय आहे फरक? लोकांना या नव्या तंत्रज्ञानाची भीती का वाटते?

रेड नोटीस : गुन्हेगार व्यक्तीचा ठावठिकाणा शोधणे आणि तिला अटक करणे; जेणेकरून त्या व्यक्तीवर खटला चालविता येईल किंवा तिला शिक्षा करता येईल.

यलो नोटीस : अनेकदा अल्पवयीन किंवा स्वत:ची ओळख सांगण्यास असमर्थ असलेल्या व्यक्ती हरवतात. अशा व्यक्तींना शोधून, त्यांना मदत करण्यासाठी ही नोटीस पाठवली जाते.

ब्लू नोटीस : एखाद्या गुन्हेगारी खटल्याच्या पुढील तपासासाठी एखाद्या व्यक्तीची ओळख, ठावठिकाणा किंवा तिच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी ही नोटीस पाठवली जाते.

ब्लॅक नोटीस : अनोळखी मृतदेहांची माहिती मिळविणे हा या नोटिशीचा उद्देश असतो.

ग्रीन नोटीस : सार्वजनिक सुरक्षिततेसाठी धोकादायक मानल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या हालचालींबाबत सावधगिरीची सूचना देण्यासाठी ही नोटीस दिली जाते.

ऑरेंज नोटीस : सार्वजनिक सुरक्षेसाठी गंभीर आणि नजीकच्या काळात धोकादायक ठरू शकतील अशी एखादी घटना, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू अथवा एखाद्या प्रक्रियेबाबत सावधगिरीचा इशारा देण्यासाठी या नोटिशीचा वापर केला जातो.

पर्पल नोटीस : गुन्हेगारांच्या वस्तू, उपकरणे, काम करण्याच्या पद्धती, छुप्या हालचाली इत्यादींबद्दलची माहिती शोधण्यासाठी ही नोटीस दिली जाते.

सदस्य देशाने विनंती केल्यास इंटरपोलच्या सचिवालयाकडून इतर सर्व सदस्य देशांना या नोटिस पाठविल्या जातात. इंटरपोल संस्थेद्वारे जगभरातील पोलिसांना एकमेकांना सहकार्य करता येते आणि त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. ही जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना फ्रान्समधील ल्योन येथे आहे.

प्रज्वल यांच्यासाठी पाठवलेल्या ब्लू कॉर्नर नोटिशीमुळे काय होईल?

ब्लू कॉर्नर नोटिशीलाच ‘बी सीरिज (ब्लू) नोटीस’, असेही म्हटले जाते. ही नोटीस एखाद्या व्यक्तीची ओळख पडताळून पाहण्यासाठी जारी केली जाते. एखाद्या गुन्हेगारी व्यक्तीचे तपशील प्राप्त करण्यासाठी, बेपत्ता अथवा फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय अथवा सामान्य गुन्हेगारी कायद्याचे उल्लंघन केलेल्या आणि देशाबाहेर पळून गेलेल्या आरोपीला पुन्हा देशात आणण्यासाठी ही नोटीस पाठविली जाते.

सर्वसाधारणपणे ब्लू नोटीस फौजदारी आरोप दाखल करण्यापूर्वी किंवा दाखल केल्यानंतर लगेचच जारी केली जाते; तर रेड नोटीस फरारी व्यक्तीला अटक करण्याची विनंती करण्यासाठी पाठविली जाते. सामान्यत: आधीपासून दोषी असलेल्या व्यक्तीसाठी रेड नोटीस पाठविली जाते.

हेही वाचा : विश्लेषण : जगातील ४६ टक्के दमा मृत्यू भारतात… दम्याच्या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी काय आवश्यक?

इंटरपोल एखाद्या नोटिशीची अंमलबजावणी करण्याची जबरदस्ती संबंधित देशाच्या अधिकाऱ्यांवर करू शकत नाही. बऱ्याचदा दोन देशांमधील संबंध कसे आहेत, यावरही या नोटिशीची कारवाई अवलंबून असते. जर्मनीत पळून गेलेल्या प्रज्वल रेवण्णांच्या प्रकरणाचा विचार केल्यास, भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतील संबंध सौहार्दाचे आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये कारवाई करताना दोन्ही देश एकमेकांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करून, संबंधित व्यक्ती अथवा गुन्हेगारावर कारवाई करू शकतात. याआधी इंटरपोलने २०२० मध्ये बाबा नित्यानंद याच्याविरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी केली होती. २०१९ मध्ये त्याच्यावरही लैंगिक शोषण आणि बलात्काराचे आरोप झाले होते.