पुणे: राज्यभरासह देशविदेशातील पर्यटक पर्यटनासाठी नेहमीच लोणावळ्याला पसंती देतात. लोणावळा परिसर पर्यटन क्षेत्र विकासासाठी लोणावळ्यापासून १५ किलोमीटरवर असलेल्या प्रसिद्ध लायन्स आणि टायगर पॉईंट येथे स्काय वॉक विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे लोणावळ्यात दोन हजार फूट दरीतून पर्यटकांना चालण्याचा आनंद घेता येणार आहे. या माध्यमातून निसर्गाचे विलोभनीय रुप पाहता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांचे संकल्पनेतून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील वन विभागाच्या मौजे आतवन येथील राखीव वन गट क्रमांक १६६ मधील आठ हेक्टर क्षेत्रात हा स्काय वॉक पीएमआरडीएकडून विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी पर्यटन विकास विभागाकडून निधी दिला जाणार आहे.

हेही वाचा… धक्कादायक! ४० रेल्वे प्रवाशांना अन्नातून विषबाधा; भारत गौरव यात्रेतील प्रकार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists can enjoy walking through the two thousand feet valley in lonavala pune print news psg 17 dvr