मिसळ म्हटलं की जी नावं पटकन घेतली जातात, त्यात भवानी पेठेतल्या वटेश्वर भुवनचा उल्लेख अपरिहार्य असतो. गेली त्रेपन्न वर्ष हे हॉटेल मिसळप्रेमींच्या सेवेत आहे आणि पुण्याच्या पूर्व भागात असलेलं खवय्यांचं हे एक आवडीचं ठिकाण आहे.

Chillar Party, Chillar Party Celebration Twelfth Anniversary, Special Children Film Screening , Chillar Party with Special Children Film Screening, Special Children Film Screening in Kolhapur, Kolhapur news, children special film Kolhapur, Kolhapur news, Chillar Party news, marathi news,
चिल्लर पार्टीचा बारावा वर्धापन दिन दुर्गम वाड्यावस्त्यांतील मुलांसोबत
Hanuman Temple Name in Pune Hanuman Jayanti 2024
‘जिलब्या मारुती, डुल्या मारुती…’ पुण्यातील प्रसिद्ध मारुती मंदिरांना का पडली असतील अशी नावे? जाणून घ्या…
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

मिसळीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘वटेश्वर भुवन’ची शाखा नुकतीच कोथरूडमध्ये सुरू झाल्यामुळे मिसळप्रेमींना आणखी एक चांगलं ठिकाण आता उपलब्ध झालं आहे. गेली तब्बल त्रेपन्न वर्ष नावलौकिक टिकवून ठेवलेल्या वटेश्वरची मिसळ खाणं हा एक वेगळाच अनुभव असतो. भवानी पेठेतल्या गूळ आळीत असलेलं जुनं वटेश्वर भुवन ज्यांना आठवत असेल त्यांना नव्या वटेश्वरमधला बदल लगेच लक्षात येतो पण हा बदलही सर्वाना भावला आहे आणि मुख्य म्हणजे मिसळीचा; म्हणजे चवीचा जो आनंद पूर्वी इथे मिळायचा तोच आनंद आजही इथे मिळतो. हीच इथली खासियत.

वटेश्वर पहिल्यापासून प्रसिद्ध आहे ते मिसळ आणि मटार उसळीसाठी. रामचंद्र कुदळे यांनी स्वत:च्या वाडय़ात १९६४ मध्ये हे हॉटेल सुरू केलं आणि त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय आता उत्तमरीतीनं सांभाळत आहे. इथल्या र्तीदार मिसळीची जी वैशिष्टय़ं आहेत त्यातलं मुख्य वैशिष्टय़ं म्हणजे मिसळीतले घटक पदार्थ. कांदे पोहे, बटाटा भाजी, शेव आणि चिवडा त्यावर कांदा, कोथिंबीर हे या मिसळीतले मुख्य घटक पदार्थ. तेही सगळे उत्तम प्रतीचे आणि उत्तम चवीचे असतात. शेवदेखील तयार आणली जात नाही तर ती हॉटेलमध्येच बनवली जाते. जी गोष्ट शेवेची तीच चिवडय़ाची. दगडी पोह्य़ाचा आणि नायलॉन पोह्य़ाचा असे दोन चिवडय़ाचे प्रकार एकत्र करून तयार केलेला चिवडा इथल्या मिसळीसाठी वापरला जातो. बटाटा भाजी देखील मिसळीची रंगत वाढवणारी असते. ही झाली मिसळीची मुख्य डिश. या डिशबरोबर दिल्या जाणाऱ्या वाटीतलं तिखट सँपल मिसळीवर हळूहळू ओतत मिसळ खायला सुरुवात करायची. या सँपलचंही वेगळेपण आहे. खास चवीच्या मसाल्यांबरोबरच गूळ, पुदिना आणि दही यांचा वापर करून हे सँपल बनवलं जातं. नव्या जमान्याप्रमाणे या सँपलचा तिखटजाळपणा आता किंचित कमी करण्यात आला आहे. पण ज्यांना तिखट मिसळ हवी असते त्यांना वेगळी तिखट र्तीही इथे घेता येते.

मिसळीबरोबरच मटार उसळ स्लाईस किंवा मटार उसळ पुरी, पुरी भाजी, गोल भजी, बटाटा वडा, वडा सँपल, पाव सँपल, पुरी सँपल, पॅटिस हे इथले आणखी काही पदार्थ. सगळेच पदार्थ चविष्ट आणि ताजे मिळत असल्यामुळे त्यांनाही मागणी खूप असते. मिसळीनंतर इथल्या चहालाही पर्याय नाही.

हे हॉटेल सुरू झालं तेव्हा भवानी, नाना, रविवार पेठ हा त्या काळात मुख्य घाऊक बाजारपेठेचा भाग होता. दिवसभर शेतकरी, व्यापारी यांच्यासह ग्राहकांचीही मोठी गर्दी या भागात असायची. अशा कष्टकऱ्यांना दुपारच्यावेळी पोटभर काहीतरी मिळावं म्हणून रामचंद्र कुदळे यांनी मिसळीचं हॉटेल सुरू केलं. मिसळ किंवा इतर पदार्थ तयार करण्याच्या ज्या पद्धती त्यांनी तेव्हा ठरवल्या त्याच पद्धतीनुसार आजही इथले सगळे पदार्थ तयार होतात. हॉटेलचा भटारखाना सहसा आपल्याला पहायला मिळत नाही. इथे मात्र अगदी त्या उलट प्रकार आहे. या व्यवसायातली दुसरी पिढी म्हणजे प्रमोद कुदळे. त्यांनी सन २००२ मध्ये हॉटेलचं नूतनीकरण केलं तेव्हा येणाऱ्या ग्राहकांना आपला भटारखाना अगदी सहज दिसला पाहिजे, त्यांना तो पाहताही आला पाहिजे, अशी रचना केली. त्यामुळे भटारखान्यातील सगळ्या गोष्टी आपण इथे पाहू शकतो. अगदी पदार्थ तयार होत असतानाही पहायला मिळतात किंवा मिसळीची डिश कशी भरली जाते तेही पाहता येतं. या सगळ्या प्रकारात येथील स्वच्छता आणि टापटीप सहजच लक्षात येते. इथले आचारी आणि अन्य सर्व नोकरवर्ग हा पहिल्यापासूनच दक्षिण भारतीय आहे. रामचंद्र कुदळे यांनी या मंडळींना मिसळ, भजी वगैरे अनेक मराठी पदार्थ केवळ शिकवलेच नाहीत तर ते बनवता बनवता त्यात त्यांचा हातखंडाही निर्माण झाला.

या व्यवसायाला नव्या गोष्टींची म्हणजे आधुनिकतेची जोड मिळत आहे. मिसळ किंवा इतर पदार्थ ‘पार्सल’ देण्यासाठी नवे तंत्र आले आहे. प्रमोद यांचा मुलगा करण या तिसऱ्या पिढीने या व्यवसायाची जबाबदारी आता घेतली आहे. करण हा सनदी लेखापाल (चार्टड अकौन्टंट) आहे. त्याची स्वत:ची कंपनी आहे आणि तो घरचा व्यवसायही सांभाळत आहे. चवीत किंवा पदार्थाच्या दर्जात कुठेही बदल न करता चांगल्यात चांगले पदार्थ देण्याचा परिपाठ इथे आवर्जून सांभाळला जातो आणि ही मिसळ वर्षांनुवर्ष खवय्यांच्या पसंतीला उतरण्याचं मुख्य कारणही हेच आहे.

कुठे?

  • १२३ भवानी पेठ, गूळ आळी
  • केव्हा: सकाळी आठ ते सायंकाळी सहा (रविवारी दुपारी अडीचपर्यंत)
  • कुठे: कर्वेनगर, मधुबन सोसायटी, गाळा क्रमांक २
  • केव्हा: सकाळी आठ ते दुपारी दीड सायंकाळी पाच ते रात्री आठ (सोमवारी अर्धा दिवस)