दिल्ली: बिहारची निवडणूक २०२५ मध्ये होणार आहे. बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री आणण्याचे ध्येय आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक होईपर्यंत खासदारकीसाठी इच्छुक नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली. बिहारमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर विनोद तावडे यांचेही नाव राज्यसभेसाठी चर्चेत होते. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही तावडे यांना भाजपकडून तिकीट मिळणार का, या बाबत चर्चा आहे. राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुस्तक महोत्सवाला तावडे यांनी भेट दिली.

हेही वाचा – माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी भाजपच्या राज्यसभा उमेदवार; कुलकर्णी यांचे पुनर्वसन

खासदारीबाबत विचारले असता तावडे म्हणाले, की बिहारची निवडणूक हे सध्या प्राधान्य आहे. या निवडणुकीतून भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे बिहारची निवडणूक होईपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे खासदारकीसाठी इच्छुक नाही. २०२५ नंतरच खासदारकीबाबत विचार करता येईल.

हेही वाचा – ‘या’ कारणांमुळे मागासवर्ग आयोगातून मेश्राम यांना हटविल्याचा आरोप

उमेदवारीमध्ये समतोल

राज्यसभेसाठी भाजपकडून दिलेल्या उमेदवारीबाबतही तावडे यांनी प्रतिक्रिया दिली. उमेदवारीमध्ये चांगल्या प्रकारे समतोल राखण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What bjp leader vinod tawde said about mp pune print news ccp 14 ssb
First published on: 14-02-2024 at 19:12 IST