मुख्य सचिवांनी लेखी आदेश काढल्याशिवाय राज्यातील तलाठी पीक कापणी प्रयोग करणार नाहीत, अशी आडमुठी भूमिका तलाठ्यांनी घेतल्यानंतर अखेर मुख्य सचिवांनी याबाबतचे लेखी आदेश काढले आहेत. त्यामुळे पीक विमा आणि अतिवृष्टीची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सात ऑक्टोबर रोजीच्या अंकात दिले होते. या वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी मुख्य सचिवांनी लेखी आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पीक कापणी प्रयोग लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>>पुणे : डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य , महापालिका आयुक्तांची ग्वाही

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Water tariff, Kalyan Dombivli, Administration decision,
कल्याण डोंबिवलीकरांना जुन्या दरानेच यावर्षीही पाणी दर आकारणी, पाणी दर न वाढविण्याचा प्रशासनाचा निर्णय
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे

राज्यातील खरीप पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली असूनही, महसूल विभागाने पीक कापणी प्रयोग सुरू केले नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानतंर प्रशासनाला खडबडून जाग आली. मुख्य सचिवांनी तोंडी आदेश देण्याऐवजी लेखी आदेश देण्याची भूमिका तलाठ्यांनी घेतली होती.
कृषी आणि ग्रामविकास विभागाने पीक कापणी प्रयोग पूर्ण करून संबंधितांना अहवाल पाठवला होता. मात्र, महसूल विभाग पीक कापणी प्रयोग पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत पीक कापणी प्रयोगाचा अहवाल अंतिम होत नाही. हा अहवाल अंतिम न झाल्यास पीकविमा योजना किंवा अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्यात अडथळे येणार होते.

हेही वाचा >>>भीमाशंकर निघालेल्या भाविकांच्या बसला आग ; बसचालकाच्या तत्परतेमुळे भाविक बचावले

महसूल ग्रामविकास विभागाने प्रत्येकी ३४ टक्के, कृषी विभागाने ३६ टक्के, अशा प्रकारे राज्यातील पीक कापणी प्रयोग पूर्ण करावेत, असे आदेश यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, पीक कापणी प्रयोग हे कृषी विभागाचे काम आहे, अशी भूमिका महसूल विभागाने घेतली होती. हा वाद सोडविण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत संबंधित विभागाचे सचिव आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती. त्या बैठकीत पीक कापणी प्रयोग हे महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने सम प्रमाणात करावेत आणि शेतकरी हित लक्षात घेऊन समन्वय साधून जबाबदारीने पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले होते. मात्र हे आदेश तोंडी असून, लेखी आदेश मिळत नाहीत, तोपर्यंत पीक कापणी प्रयोग सुरू करणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघाने घेतली होती.

उपयोग काय?

हेही वाचा >>>पुणे : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे आमिष ; ज्येष्ठ महिलेची १५ लाखांची फस‌वणूक

मुख्य सचिवांनी राज्यातील तलाठ्यांना पीक कापणी प्रयोगाबाबतचे लेखी आदेश दिले असले तरी आता राज्यातील कडधान्य पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. सोयाबीन आणि बाजरी पिकांची काढणी अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग करण्याचा काळ उलटून गेला आहे. त्यामुळे या आदेशाचा उपयोग काय, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.