रविवार म्हणजे नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश मराठी घरांमध्ये पाहायला मिळते. काहीजणांकडे तर रविवारी ठरवून नॉन व्हेज खाल्ले जाते. रविवारच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे घरामध्ये सर्वजण असतात. अशा वेळी आराम करायच्या दिवशी चमचमीत काहीतरी खायला मिळालं तर किती बरं होईल असं प्रत्येकाला वाटत असते.प्रत्येक सन्डेला चिकन,मटण खाऊन कंटाळा येतो, तेव्हा पटकन होणारा पदार्थ करावा असे वाटते,मग हा पदार्थ छान आहे. चला तर मग आज पाहुयात गावरान मुशीचं कालवण कसं करायचं. आज आपण खास गावरान पद्धतीने झणझणीत मुशीचं कालवण कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावरान मुशीचं कालवण साहित्य

१. २ मिडीयम मुष्या मासे(स्किन काढून ६ ते ८ तुकडे)
२. आखे गरम मसाले/ दोन मोठे चमचे: काळी वेलची,मिरी,लवंग, दालचिनी,
३. तीळ, खस खस,मेथी दाणे पाच, दगड फुल (भाजुन वाटण मघ्ये घालावें)
४. चमचा आले लसूण पेस्ट दिड
५. १ वाटी कांदा खोबरे आले लसूण भाजुन वाटण
६. १ लिंबाचा रस
७. ३ चमचे हळद,एक एक चमचा लाल ल तिखट धणे जीरे पूड,
८. चमचा कोल्हापुरी मसाला दिड
९. मीठ चवीनुसार
१०. २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
११. १ पाखली आमसूल आंबट करिता

गावरान मुशीचं कालवण कृती

१. प्रथम मुशी माष्या चे तुकडे चोळून धुऊन एका टोपात घेऊन त्यात एक चमचा हळद आणि लिंबू रस,एक चमचा मीठ घालून त्याच्या अंगावर चोळून लावावे आणि एक तास टोप झाकून ठेवावे.

२. आता कांदा लसूण आले खोबरे भाजुन घ्यावे आणि आखे गरम मसाले पण भाजुन चां बारीक वाटण तयार करून ठेवावे.आले लसूण पेस्ट पण तयार करून ठेवावे.

३. आता एक तास टोपात ली मुशी ला जास्त पाण्याने चोळुन धुऊन घ्यावे. नंतर आले लसूण पेस्ट लाऊन ठेवावे आता एका टोपात तेल गरम करावे आणि त्यात वाटण तेल सुटेपर्यंत परतावे.

४. नंतर सगळे मासाले, मीठ घालून हलवून घ्यावे आणि नंतर मासे घालून हलवून घ्यावे आणि नंतर त्यात एक प्याला पाणी घालून मासे रस्सा तीन ते चार मिंट उकळत ठेवावे नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावें.

हेही वाचा >> हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

५. आता त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम झनझनित गावरान मुशी च कालवण खायाला घ्यावे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gavran mushich kalvan recipe in marathi baby shark fish recipe in marathi malavni fish curry recipe srk