Vangyache Bharit Recipe: अनेकांना वांग्याची भाजी खायला आवडत नाही. पण बरेचजण जरी वांग्याची भाजी खात नसले तरीही त्यांना वांग्याचे भरीत खायला खूप आवडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अस्सल मालवणी पद्धतीने वांग्याचे भरीत कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

वांग्याचे भरीत बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. २ मोठी वांगी
२. २ कांदे बारीक चिरलेले
३. १ टोमॅटो बारीक चिरलेला
४. २ चमचे तेल
५. १ चमचा मोहरी
६. १/४ चमचा हिंग
७. १/४ चमचा हळद
८. १/४ चमचा लाल तिखट
९. ५-६ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
१०. मीठ चवीनुसार
११. चिरलेली कोथिंबीर

वांग्याचे भरीत बनवण्याची कृती:

१. सर्वात आधी वांगी चांगली भाजून घ्या आणि ही वांगी गार होवू द्या.

२. आता वांगी सोलून आतील गर बाजूला काढावा आणि सुरीने वांगी चिरुन घ्या.

३. त्यानंतर कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग, लसूण, हळद, लाल तिखट घालून फोडणी द्या.

४. आता कांदा घालून परतून घ्या, त्यानंतर त्यात टोमॅटो घालून एकदम मऊ होईपर्यंत परतून घ्या.

५. त्यानंतर त्यात सोललेल्या वांग्याचा गर घालून व्यवस्थित परतून घ्या.

६. वांग्याचे भरीत ५ ते १० मिनिट परतत राहा, वांग्याच्या कडेने तेल सुटले की गॅस बंद करा.

हेही वाचा: सकाळच्या नाश्त्यासाठी खास ‘रव्याचे गोड आप्पे’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. तयार गरमागरम वांग्याचे भरीत भाकरीबरोबर सर्व्ह करा.