Purana chi Karanji: दिवाळीत आवर्जून अनेकांच्या घरी करंजी बनवली जाते. पण यावेळी पण रव्याच्या सारणाची करंजी तर कधी तीळाच्या सारणाची करंजी बनवतो. या दोन्ही प्रकारचे सारण असलेली करंजी चवीला खूप छान लागते. पण तुम्ही कधी पुरणाचे सारण असलेली करंजी खाल्ली आहे का? बऱ्याच जणांनी ही करंजी कधी ट्राय केली नसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुरणाची करंजी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

पुरणाची करंजी तयार करण्यासाठी साहित्य: (Purana chi Karanji)

१. २ कप गव्हाचे पीठ
२. २ चमचे रवा
३. २ कप चण्याची डाळ
४. २ कप किसलेला गूळ
५. १ चमचा वेलेची पूड
६. १ चमचा जायफळ पावडर
७. तेल आवश्यकतेनुसार
८. हळद चिमूटभर
९. मीठ चवीनुसार

पुरणाची करंजी तयार करण्याची कृती:

१. सर्वात आधी चण्याची डाळ ४-५ वेळा स्वच्छ धुवून घ्या.

२. त्यानंतर त्यात दोन कप पाणी आणि चिमूटभर हळद घालून ती शिजवून घ्या.

३. डाळ शिजेपर्यंत करंजीच्या बाहेरचे आवारण तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाच्या पीठ घेऊन त्यात तेल, रवा आणि मीठ घालून कणीक मळून घ्या.

४. गव्हाचे पीठ मळून झाल्यानंतर ते १५-२० मिनिटांसाठी तसेच ठेवा आणि शिजलेल्या डाळीचे पाणी एका भांड्यात काढून घ्या.

५. आता पुरण शिजवण्यासाठी गॅसवर कढई ठेवा आणि कढईत शिजलेली डाळ आणि गूळ घालून हे मिश्रण परतत राहा.

६. हे मिश्रण शिजल्यानंतर गॅस बंद करुन थंड झाल्यावर ते बारीक करुन त्यात झाल्यानंतर वेलची पूड, जायफळ पावडर आणि चवीनुसार मीठ घाला.

७. हे सर्व झाल्यानंतर मळलेल्या गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करुन घ्या.

८. गोळे तयार झाल्यानंतर एक गोळा घेऊन तो पूरी सारखा लाटून त्यामध्ये डाळीचे बारीक मिश्रण घालून करंजीच्या आकारत ते कापून घ्या.

हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत असा बनवा ग्रीन फ्राईड राईस; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

९. आता गरमा गरम तेलामध्ये ही करंजी तळून घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०. लालसर होईपर्यंत करंजी तळा, सर्व करंज्या तळून झाल्यानंतर त्यांचा साजूक तूपासह आस्वाद घ्या.