महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी वांग्याची घोटलेली भाजी…

झणझणीत खान्देशी वांग्याची घोटलेली भाजी साहित्य

Yerawada police arrested three people for robbed young man at gunpoint
पिस्तुलाच्या धाकाने तरुणाची लूट, येरवडा पोलिसांकडून तिघे अटकेत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Pet dog owner, Dombivli, Samrat Chowk,
डोंबिवलीत सम्राट चौकात पाळीव श्वान मालकाची वडील-मुलाला ठार मारण्याची धमकी
nutritious sweet potato kheer
श्रावणातल्या उपवासात आवर्जून बनवा ‘रताळ्याची पौष्टिक खीर’; नोट करा साहित्य आणि कृती
india s First Female F1 Racer salva marjan marathi news
साल्वा मार्जन… भारतातली पहिली एफ-१ रेसर
Maharashtrian batatyachi bhaji recipe naivedya recipe
नैवेद्याची बटाटा भाजी; १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याची किंमत
price, gold, gold rate, gold price in mumbai,
सोन्याचा दर देशभर एकच असू शकतो का? कसा?

२५० ग्राम वांगी
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून मोहरी
बारीक चिरलेली कोथिंबीर
३ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
मसाला बनवण्यासाठी
१ इंच आलं
६-७ लसूण पाकळ्या
१ इंच दालचीनी
५-६ काळीमिरी
३ लवंगा

झणझणीत खान्देशी वांग्याची घोटलेली भाजी कृती

१. वांगी स्वच्छ धुवून चिरून पाण्यामध्ये घालून ठेवा, एका कुकर मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे घालून खमंग फोडणी करून घ्या

२. खलबत्त्यात मध्ये आलं, लसूण दालचीनी, लवंग,आणि काळीमिरी कुटून हा तयार फ्रेश मसाला तेलात घालून परतून घ्या, त्या नंतर हिरव्या मिरच्या घालून घ्या

३. आता त्यात हळद, लाल तिखट, आणि चिरलेली वांगी घालून परतून घ्या

४. चवीनुसार मीठ, घालून १ कप पाणी घालून घ्या, आणि कुकरला ३ शिट्या काढून घ्या

५. कुकर थंड झाला की भाजी गरम असताना मॅशर किंवा चमच्याने घोटून घ्या आणि वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा घोसाळ्यांचे भरीत; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी

६. अशाप्रकारे खायला तयार आहे,एकदम सोप्पी अशी..! “झणझणीत खान्देशी वांग्याची घोटलेली भाजी”वरण-बट्टी किंवा कळण्याच्या,ज्वारीच्या किंवा मग तांदळाच्या भाकरी सोबत ही भाजी मस्त लागते..