अनेकदा आयुष्यात जे हवं असतं त्याच्या मागे आपण इतके पळत जातो की आवडती गोष्ट नाही मिळाली तर जगूच शकणार नाही, असा ग्रह होऊन बसतो. त्यामुळे ती गोष्ट हातून निसटून जाऊ नये याचा आटोकात प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असते. पण आपल्याला आवडणारी गोष्ट इतर पर्यायांनीही मिळवता येऊ शकते हे मानायला आपलं मन आणि बुद्धी तयार नसते अशावेळी काय करावं, याची उकल ‘टीटीएमएम’ म्हणजे ‘तुझं तू माझं मी’ हा सिनेमा बघताना होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या लग्न करायचं नाही आणि एकदा का लग्न केलं तर बंधनात अडकू या विचाराने जय म्हणजेच ललित प्रभाकर ऐन लग्नातून पळून जातो तर दुसरीकडे राजश्री म्हणजे नेहा महाजनही लग्न ठरलंय म्हणून घरातून पळून जाते. योगायोगाने जय आणि राजश्री सह-प्रवासी बनतात. प्रवासादरम्यान त्यांच्यात भांडणं होतात, नंतर मैत्री होते आणि नंतर पुन्हा भांडण होतात. पुण्यातून सुरू झालेला हा प्रवास गोव्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि परत पुण्यात येऊनच थांबतो. या मधल्या प्रवासात त्यांना लग्नाचं नाटक करावं लागतं. यात दोघांच्याही मनाविरुद्ध त्यांचं खरंखुरं लग्नही होतं. पण गोव्यातलं लग्न गोव्यातच राहील हा विचार करुन ते दोघंही गोव्यात आयुष्य एन्जॉय करत असतात. पण या दरम्यान दोघांचेही घरातले त्यांना शोधत गोव्यापर्यंत पोहोचतात. त्यांचं लग्न झालेलं पाहून त्यांनाही मोठा धक्का बसतो. पण त्यांना लग्न का करावं लागतं. नंतर त्या लग्नाचं काय होतं आणि नंतर ते खरंच एकत्र राहतात का हे जाणून घेण्यासाठी टीटीएमएम हा सिनेमा एकदा तरी पाहावा असा आहे.

मराठीतील सर्व चित्रपट समिक्षण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalit prabhakar neha mahajan starrer ttmm tujha tu majha mi marathi movie review
First published on: 16-06-2017 at 09:14 IST