भारताच्या इतिहासात १९८४ या वर्षाची ओळख केवळ राजीव गांधींच्या काँग्रेसला ‘४०० पार’ जागा देणारे वर्ष एवढीच नाही- तशी असूही नये. याच वर्षात ‘निरमा’, ‘जयपॅन’ अशा मध्यमवर्गाला परवडणाऱ्या नाममुद्रांची सुरुवात झाली; पण दुसरीकडे फ्लॉपी डिस्कची पहिली भारतीय कंपनी ‘अॅमकेट’, ‘एचएमटी’ या सरकारी कंपनीच्या घड्याळांना शह देणारी ‘टायटॅन’, औषधनिर्मितीचे संशोधनही भारतात करू पाहणारी ‘डॉ. रेड्डीज’ अशा उद्याोगांची वाटचालही याच वर्षीपासून सुरू झाली. आज चाळिशीच्या होऊन देशभर सुपरिचित झालेल्या या भारतीय नाममुद्रांपैकी एक म्हणजे ‘नॅचरल्स आइस्क्रीम’! शहाळे, सीताफळ, अंजीर, फणस… या फळांच्या स्वादाचे आइस्क्रीम खाण्याची सवय भारतात रुजवली ती ‘नॅचरल्स’ या आइस्क्रीम-विक्रेत्या दुकानमाळेचे जनक रघुनंदन कामत यांनी. या कामत यांचे निधन १८ मे रोजी झाल्याचे जरा उशिरानेच जगाला कळले, पण ‘ते गेले तरी त्यांच्या आइस्क्रीमची चव तीच राहील’, असा विश्वास कैक चाहत्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >>> अन्वयार्थ: छेत्रीनंतर कोण?

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about naturals ice cream founder raghunandan kamath zws
First published on: 21-05-2024 at 01:02 IST