scorecardresearch

Premium

चाहूल: प्रशासकीय सेवेभोवतीचे वलय भेदणारी पुस्तके..

तत्त्वनिष्ठ माजी सनदी अधिकारी आणि रोखठोक लेखक म्हणून ओळखले जाणारे अनिल स्वरूप यांचे ‘एन्काउंटर्स विथ पोलिटिशियन्स’ हे नवे पुस्तक येत्या २१ जानेवारी रोजी प्रकाशित होणार आहे.

book
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

तत्त्वनिष्ठ माजी सनदी अधिकारी आणि रोखठोक लेखक म्हणून ओळखले जाणारे अनिल स्वरूप यांचे ‘एन्काउंटर्स विथ पोलिटिशियन्स’ हे नवे पुस्तक येत्या २१ जानेवारी रोजी प्रकाशित होणार आहे. त्यांच्या याआधी प्रकाशित झालेल्या ‘नॉट जस्ट अ सिव्हिल सर्व्हट’, ‘एथिकल डायलेमाज ऑफ अ सिव्हिल सर्व्हट’ आणि ‘नो मोअर अ सिव्हिल सर्व्हट’ या तीन पुस्तकांतून त्यांनी वाचकांना सनदी अधिकाऱ्यांच्या जीवनातील आव्हाने उलगडून दाखविली होतीच.

स्वरूप यांच्या या ३८ वर्षांच्या अनुभवाचे सार त्यांनी ‘नॉट जस्ट अ सिव्हिल सर्व्हट’मध्ये मांडले आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये आणि पुढे केंद्र सरकारमध्ये सेवा दिली. भ्रष्टाचार, कोळसा माफियांचा बंदोबस्त, शिक्षण माफियांचा सामना, बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतरचा काळ, तेव्हा घ्यावे लागलेले कठोर निर्णय याचे वर्णन या पुस्तकात आहे. प्रशासकीय सेवेभोवती एक विशिष्ट वलय असते. स्वरूप यांचे ‘नो मोअर अ सिव्हिल सर्व्हट’ हे पुस्तक हे वलय किती भ्रामक आहेत, हे निदर्शनास आणते. उत्तम प्रशासनाचीही काही अनुकरणीय उदाहरणेही देते. ‘एथिकल डायलेमाज ऑफ अ सिव्हिल सर्व्हट’ हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याला किती पातळय़ांवर लढा द्यावा लागतो, प्रचंड राजकीय दबाव असताना योग्य काय आणि अयोग्य काय हे कसे ठरवावे, योग्य पर्यायांसाठी आग्रही राहणाऱ्यांना काय किंमत मोजावी लागते आणि ती मोजणे किती अपरिहार्य आहे, याची उत्तरे हे पुस्तक देते.

netflix documentry on sheena bora
नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार्‍या इंद्राणी मुखर्जी- शीना बोरा माहितीपटाला स्थगिती देण्यामागे नेमके कारण काय?
what is bharat mart
यूपीएससी सूत्र : दुबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेले ‘भारत मार्ट’ अन् एमएसपी संदर्भातील संजय अग्रवाल समिती, वाचा सविस्तर…
World Book Fair in Delhi from today
दिल्लीत आजपासून विश्व पुस्तक मेळा
investment guidance Loksatta Arthabhan program at Borivali
गुंतवणुकीचे मार्ग, ‘इच्छापत्रा’बाबत मार्गदर्शन; बोरिवलीत शनिवारी ‘लोकसत्ता अर्थभान’ कार्यक्रम

प्रशासकीय अधिकारी समाजात किती मूलभूत बदल घडवून आणू शकतात, याची जाणीव ही पुस्तके करून देतात. हस्तिदंती भासणाऱ्या या मनोऱ्यात विराजमान झालेल्या मूल्यनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आयुष्यातील संघर्षांची झलकही दाखवितात. अनिल स्वरूप यांची रोखठोक शैली आणि त्यांचा प्रदीर्घ कारकीर्द पाहता नव्या पुस्तकात त्यांनी नेत्यांविषयीचे कोणते अनुभव सांगितले असावेत, याविषयी उत्सुकता आहे..

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chahul books that pierce the ring around administrative services amy

First published on: 02-12-2023 at 00:10 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×