‘हर्फ-ए-हक लिखके कलम सर हुआ अपना लेकिन। रिश्ता कोई तो चलो सर से कलम का निकला।। ’ – हा शारिब रुदौलवी यांचा शेर काहींना निव्वळ चमकदार शब्द-खेळ वाटेल, पण ‘स्वातंत्र्योत्तर काळात प्रश्न निराळे झाले, सत्तेला सत्य (हर्फ-ए-हक) सांगण्याचे आणि लोकशाही टिकवण्याचे प्रश्न वाढले- तरक्कीपसंद शायरांचेही काम या काळात बदलले आणि त्यातून काही जणांनी सांकेतिकतेचा आश्रय घेतला. आशय पोहोचवण्याचे काम कठीण झाले’ इतकी स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण जाणीव समीक्षक आणि प्राध्यापक म्हणूनही नाव कमावलेल्या रुदौलवींना होती. शब्दांचा खेळ करून ‘वाहवा’ मिळवण्याची नशा ‘मलाही १९५७ ते ६० या काळात आवडे’ असे ते सांगत, पण पुढे त्यांनी मुशायऱ्यांत जाणे बंद केले. त्याऐवजी ते ग्रंथालयात स्वत:ला गाडून घेऊ लागले. त्यांचे निधन गेल्या बुधवारी- १८ ऑक्टोबर रोजी झाले असले, तरी त्यांची ३० हून अधिक उर्दू पुस्तके त्या भाषेतून नव्या- आधुनिक जाणिवा टिकवण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक राहतील.

या पुस्तकांत काय नाही? त्यांचे स्वत:चे गझलसंग्रह तर आहेतच, पण इतर शायरांची त्यांनी केलेली सटीक संकलने आहेत, समीक्षाग्रंथ आहेत तसेच समाज आणि साहित्य, समाज आणि (रूढार्थाने साहित्यबाह्य) अभिव्यक्ती यांचा अभ्यास करणारे दीर्घनिबंधही आहेत. साहित्य आणि समाज यांच्याकडे समदृष्टीने पाहणे, त्यांच्या अंत:संबंधाचा अभ्यास करणे ही जणू शायरीची पुढली पायरी असल्याचे त्यांच्या लक्षात येत गेले आणि मुशायऱ्यांऐवजी पावले ग्रंथालयाकडे वळली. पण या ग्रंथालयाला ‘बाहेरच्या जगाकडे पाहण्याच्या खिडक्या’ भरपूर होत्या! ग्रंथालयात मार्क्‍सपासून काफ्कापर्यंत कोणतेही वाचन वज्र्य नाही, तसेच समाजातील कोणतीही गोष्ट अभ्यासासाठी नालायक मानण्यात अर्थ नाही, हे त्यांना उमगले. यामुळेच, त्यांचा सर्वाधिक गाजलेला अभ्यास ‘मर्सिया’बद्दल- म्हणजे मुळात अरबीमध्ये फक्त इमाम हुसेनच्या करबला-बलिदानाबद्दलच लिहिल्या गेलेल्या, पण भारतात रुळल्यानंतर रूप आणि सादरीकरणही बदललेल्या शोकगीतांबद्दल – असून भारतीय ‘मर्सिया’तील नाटय़, त्यातले भारतीय राग, त्यातून प्रतीत होणारी गंगाजमनी संस्कृती, कालौघात बदलत गेलेले आणि फारसी-अरबीपासून अधिकाधिक मुक्त झालेले उर्दूचे वळण असे उपविषय त्यांनी कसून अभ्यासलेले दिसतात. ‘उर्दू ही भाषाच मुळात प्रेमातून जन्मलेली आहे’ असे प्रतिपादन शारिब रुदौलवी आग्रहाने करत. या एका विधानाला मोहम्मद घोरीपासूनच्या इतिहासातून आजपर्यंतचे सज्जड आधार देण्याची त्यांची तयारी असे. ‘नाटय़मय’ या शब्दासाठी ‘ड्रामाई’ असा प्रतिशब्द योजून उर्दूच्या मुक्त वाढीला स्वत: हातभारही लावत.

caribbean writer maryse conde profile author maryse conde information zws
व्यक्तिवेध : मारिस कॉण्डे
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये

अयोध्येनजीकच्या रुदौली गावातील जहागीरदार कुटुंबात १९३२ मध्ये जन्मलेल्या मुसय्यब अब्बासी यांचे शारिब रुदौलवी हे टोपणनाव. ‘शारिब’ म्हणजे भोक्ता, पिणारा. निव्र्यसनी, सज्जन प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक विद्यार्थ्यांच्या दोन पिढय़ांत आहे. ‘जेएनयू’च्या उर्दू विभागातून प्रपाठक म्हणून निवृत्त होण्यापूर्वी कानपूर व लखनऊमध्ये त्यांनी प्राध्यापकपदी काम केले होते.