पुस्तक ते केवढेसे, केवळ बारापानी, पानोपानी त्याच्यावरती आयुष्याची गाणी. अक्षरे आहेत, आकडे आहेत, आणखी आहेत रंग, कुठल्या कुठल्या रकान्यांना लाल फुलीचा संग. दुधाचे काय माप, कधी पेपरची दांडी, गॅस लावला कधी, कधी भरली नेटपॅकची भांडी. मीटिंग कुणाची आहे कधी, कधी आहे बारसे, पार्टीचं मात्र लिहायला, लागत नाही फारसे. कुठली ताई देते सल्ला, कसा करायचा पास्ता, त्याच पानावर योगासनांचा देतात आणि वास्ता. साधेसेच पुस्तक त्याला जगण्याचा वास, बदलावा लागतो तीस दिसांनी हरएक त्याचा मास. कागदाचे एका त्याच्या असणार वजन किती, उलगडावे सहज त्यात काय एवढी भीती. आजवर उलगडले कित्येक कागद असे, पहिल्या प्रत्येक तारखेवर आनंदाचे ठसे. तीस दिसांच्या कामाचा हिशेब तेथे चोख, धनाचा मिळतो आदेश किंवा मिळतो रोख. करता येतात हिशेब, बोटे हाताची मोडून, किती राहतील, कसे राहतील, खर्च सारा सोडून. याचे बिल, त्याचे बिल, सारा देऊन सगळा, किती उरतो हाती अडका, बघता येतो वेगळा. मोठय़ांसाठी काय अन् काय आप्तांसाठी, कुणाचे लग्न, कुणाचे बारसे, कुणाची आहे साठी. घरच्या पिल्लांसाठी कसे, काय ठेवायचे राखून, शेजाऱ्यांची नवी सायकल बघतात सारखे वाकून. तारखेसाठी याच आम्ही बघतो सारे वाट, वर्णावा काय त्याचा राजेशाही थाट. दिवस हा पहिला जणू नव्या जिण्याचा श्वास, आनंदाचे भरते आणि स्वर्गसुखाचा भास. ‘दिन है सुहाना..’ जरी जुने झाले गाणे, टिकून आहे अजून त्याचे खणखणीत नाणे. आज मात्र झाले काय, नाही नीटसे कळत, ‘खूश है जमाना आज पहली तारीख है’चे सूर नाही वळत. उलगडताना गेला मास, हात झाला जड, चढतोय भार शिरी घेऊन जणू थोरला गड. उजाडलाय आजचा दिवस, ओझे डोईवर त्याच्या, का उगाच शब्दाशब्दी, खरे तर आमच्या. एकेदिवशी घडले काही, चलन झाले कापूर, एका एका नोटेसाठी जो तो झाला आतुर. गेले दिवस, तारखा रांगांमध्ये, पाकीट नाही भरले, कुणी कुणी, कसे आणि आम्हा आहे घेरले. दुधाविना जमणार कसा फक्कड पहिला चहा? पिशवी देणारा सांगणार नक्की, पैशांचे आजच पाहा. बित्तंबातमी वर्तमानाची देतो पोरगा कुणी, बिलाविना ऐकेल एवढा, नाही मात्र गुणी. सुग्रणीच्या हातची खातो रोजच भाजी-पोळी, मेहनतान्यावर सोडेल पाणी, इतकी नाही भोळी. दिव्या दिव्या दीपोत्कार म्हणतो सारे खरे, नाही भरले रोख तर उजळणार कसे बरे? तारखेच्या पहिल्या पार्टीची झाली ऐशीतैशी, कोल्रिडकवरच भागवावी लागणार तहान कशीबशी. बारापानी पुस्तकातील एकाची ही कथा, काय वर्णावी आम्ही आणि नशिबाची व्यथा. उलटताना पुढचे पान, होईल खरेच फायदा? पन्नास दिवसांचा त्यांनी, केलाय मोठा वायदा. तरीही नाही झाले तरी उलटूच पुढची पाने, काय करावे गावेच लागते, आमचे आम्हाला (रोजचे) गाणे..

 

Careers for Dancers
चौकट मोडताना : नुपूरचे नृत्य
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!