scorecardresearch

फ्लिपकार्टमुळे झाली स्वप्नपूर्ती; मातृत्व आणि कर्तृत्वाचा सुंदर मिलाप…निलिमा शॉ!

ऑनलाईन व्यवहारांचं उत्तम व्यासपीठ असलेलं फ्लिपकार्ट अशा प्रवासामध्ये एक उत्तम पर्याय सिद्ध झालं आहे

Flipkart,
ऑनलाईन व्यवहारांचं उत्तम व्यासपीठ असलेलं फ्लिपकार्ट अशा प्रवासामध्ये एक उत्तम पर्याय सिद्ध झालं आहे

कोणत्याही नवउद्योजकाचा प्रवास हा अनेक यशापयशांनी किंवा आव्हानांनी भरलेला असतो. या प्रवासामध्ये जर योग्य असं मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला, तर सगळं चित्रच बदलून जातं. ऑनलाईन व्यवहारांचं उत्तम व्यासपीठ असलेलं फ्लिपकार्ट अशा प्रवासामध्ये एक उत्तम पर्याय सिद्ध झालं आहे. फ्लिपकार्टनं अशा प्रवासांमध्ये अनेक नवउद्योजकांना त्यांच्या यशाची गाथा लिहिण्यात मोलाची साथ दिली आहे.

आज फ्लिपकार्टवर तब्बल साडेतीन लाखाहून जास्त विक्रेते आहेत. अगदी पोशाखापासून हस्तकलेच्या वस्तूंपर्यंत अनेक प्रकारची उत्पादनं विकणाऱ्या या उद्योजकांना त्यांची स्वप्नं साकार करण्यासाठी फ्लिपकार्टनं बळ दिलं आहे. फ्लिपकार्टच्या या पुढाकारामुळे अशा नवउद्योजकांना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासोबतच आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मदत तर होतेच, पण त्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक विकास देखील साध्य करण्यात हातभार लागतो.

अशाच एक नवउद्योजिका म्हणजे निलिमा शॉ. निलिमा शॉ या हैदराबादमधील एका आयटी कंपनीमध्ये एचआर विभागात भरपूर पगाराची नोकरी करत होत्या. पण त्यांना मुलगी झाल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी बाळंतपणासाठी कंपनीतून सुटी घेतल्यानंतर कंपनीकडून सातत्याने त्या कामावर पुन्हा कधी रुजू होणार? याची विचारणा केली जात होती. पण मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांना जाणीव झाली की आपल्या मातृत्वाला नोकरीवर प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

पण काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी स्वत:चा ऑमलाईन व्यवसाय सुरू केला. फ्लिपकार्टवर त्यांनी अल्प प्रमाणात दागिने विकायला सुरूवात केली. आपल्या पत्नीचं आर्टिफिशियल दागिन्यांविषयीचं प्रेम पूरेपूर माहिती असलेल्या त्यांच्या पतीने त्यांना या कामात पूर्ण पाठिंबा आणि हातभार लावला.

आज भारतीय ग्राहकांना निरनिराळ्या प्रकारच्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये त्यांची गणना होते! फ्लिपकार्टवर ग्राहकांना आकर्षित करणारे ‘बिग बिलियन डेज’ आणि ‘डील्स ऑफ द डे’सारख्या ऑफर्समुळे आणि फेस्टिव्ह सीजनमुळे आता त्यांचा व्यवसाय चांगलाच वाढला आहे.

आपल्या या प्रवासाविषयी निलिमा म्हणतात, “२०१८मध्ये मी माझ्या घरूनच या वस्तू विकायला सुरुवात केली होती. फ्लिपकार्टमुळे मला एक आई म्हणून आणि एक व्यावसायिका म्हणून माझ्या वेळेचं नियोजन करणं अत्यंत सोपं होतं.” सुरुवातीला आठवड्याला एक अशाच सरासरीने त्यांना ऑर्डर्स मिळायच्या. पण व्हॅलेंटाईन डेमुळे त्यांच्या व्यवसायाला कलाटणी मिळाली. आधी दिवसाला १५ ऑर्डर्स अशी सुरुवात झाली आणि नंतर हे वाढतच राहिलं!

या सगळ्या बदलांमुळे निलिमा भारावून गेल्या होत्या. पण त्यांना हे माहिती नव्हतं की ‘पिक्चर अभी बाकी है’! निलिमा सांगतात, “हे सगळं सुरू असताना फ्लिपकार्टवरचा बिग बिलियन डेज उपक्रम सुरू झाला. माझ्या यशामध्ये अधिकाधिक भर पडू लागली. हे सगळं एकट्याने सांभाळणं तसं कठीण काम आहे. पण माझे कुटुंबीय माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्या पतीने तर कामावरून घरी परतल्यानंतर ऑर्डर्स पॅक करायला देखील मला मदत केली.”

‘निलूज कलेक्शन’ असं त्यांच्या इकॉमर्स व्यवसायाचं नाव आहे. कानातल्या रिंगा, कपल रिंग्ज आणि नेकलेस अशा आर्टिफिशियल दागिन्यांसाठी हा ब्रँड ओळखला जातो. आपल्या व्यवसायात मिळत असलेल्या यशामुळे हुरूप वाढलेल्या निलिमा शॉ यांनी आता पारंपरिक पोषाख आणि किचनमधील वस्तूंची देखील विक्री करण्याचं नियोजन सुरू केलं आहे. निरनिराळे सेल लागतात, तेव्हा वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी गोदामाची एक जागा देखील घेण्याचा विचार त्या करत आहेत.

याविषयी बोलताना निलिमा म्हणतात, “मी हे अभिमानाने सांगू शकते की मी आमच्या कुटुंबातली पहिली नवउद्योजक आहे. माझ्या कुटुंबाची काळजी घेतानाच मला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी फ्लिपकार्टनं मला एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे.” चेहऱ्यावर अभिमान दिसत असतानाच डोळ्यात यशाची चमक असलेल्या निलिमा म्हणतात, “नेतृत्व करण्यासाठीच माझ्या पालकांनी मला वाढवलं, शिकवलं. माझ्या मुलीलाही त्याच प्रकारचे संस्कार मिळावेत, यासाठी मी प्रयत्न करते आहे.”

मराठीतील सर्व प्रायोजित ( Sponsored ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flipkart help nilima shaw to fulfil her dream sgy

ताज्या बातम्या